पाणी शुध्दीकरणाची गरज

By admin | Published: April 15, 2015 12:12 AM2015-04-15T00:12:37+5:302015-04-15T00:12:37+5:30

जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पाणी स्त्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक प्रमाणात आढळून आल्याने नागरिकांसाठी..

Need for water purification | पाणी शुध्दीकरणाची गरज

पाणी शुध्दीकरणाची गरज

Next

अमरावती : जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पाणी स्त्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक प्रमाणात आढळून आल्याने नागरिकांसाठी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा आरोग्य शासकीय प्रयोगशाळा व पाच उपविभागीय प्रयोगशाळांमध्ये मान्सूननंतरच्या पाणी स्त्रोताच्या नमुन्यांची रासायनीक तपासणी करण्यात आलीे. त्यामध्ये प्रयोगशाळांत ४ हजार ५२८ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आल्यावर ४ हजार २५ नमुने परमिसेबल मर्यादेवर आढळून आलेत. त्यातच ३ हजार ९१७ पाणी नमुन्यांमध्ये नायट्रेट रसायनाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. अन्य पाणी नमुन्यांमध्ये २७ फ्लोराईड, २९५ लोह, ११६ टिडीएस, ९० अल्कोनिटी, ४९ पीएच (अ‍ॅसिडीक), १० टरबिरीटी, १५ नमुन्यामध्ये क्लोराईड असल्याचे आढळून आले.
हे सर्व रासायनीक द्रव्य मानवी शरीरासाठी घातक ठरणारे असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो नागरिकांच्या आरोग्याविषयी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची योग्य तपासणी करून पाणी स्त्रोत्र शुध्द ठेवण्याची गरज आहे.

खतांच्या वापरामुळे पाण्यात रासायनिक द्रव्य
शेतीसाठी उपयोगी पडणाऱ्या खंतामध्ये विविध रासायनिक पदार्थ असतात. ते शेतीसाठी वापरण्यात आल्यावर जमिनीतील पाण्यात मिसळतात. गुराढोरांच्या गोठ्यातून बाहेर निघणारे मलमुत्रसुध्दा जमिनीतील पाण्यात मिसळतात. हे रासायनिक द्रव्य असलेले दूषित पाणी विविध पाण्यांच्या स्त्रोतांमध्ये आढळून येत आहे.

Web Title: Need for water purification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.