पाण्याचे टँकर ही गरज सर्वसामान्यांची की, राजकारण्यांची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:17 AM2021-09-15T04:17:20+5:302021-09-15T04:17:20+5:30
अमरावती : दरवर्षी उन्हाळा सुरू होण्याआधीच ग्रामीण भागातून टँकरची मागणी सुरू होते. विशेषत: हिवाळा संपला की टँकरचे प्रस्ताव दाखल ...
अमरावती : दरवर्षी उन्हाळा सुरू होण्याआधीच ग्रामीण भागातून टँकरची मागणी सुरू होते. विशेषत: हिवाळा संपला की टँकरचे प्रस्ताव दाखल होतात. मात्र, खरोखरच पाण्याच्या टँकरची गरज कुणाची, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण सर्वसामान्यांपेक्षा राजकारण्यांचा पाठपुरावा नक्कीच समोर येते. त्यामुळे टँकरची गरज कुणाची सर्वसामान्यांची की, राजकारण्यांची हे शोधण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात उन्हाळ्यात मेळघाटातील धारणी, चिखलदरा, चांदूर रेल्वे, तिवसा व अन्य काही तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक असते. त्यामुळे अनेक गावात टँकरची मागणी असते.
बॉक्स
टँकरचे पाणी मुरते कुठे?
कोट
जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवाय योजनेच्या कामामुळे मोठया प्रमाणात जलस्तर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळ निवारण्यासाठी महत्त्वाची भूमिका या योजनेने बजावली असून या सरकारनेदेखील अशी योजना पुन्हा सुरू करावी.
- अर्चना पखान,
जिल्हाध्यक्षा भाजप महिला आघाडी
कोट
उन्हाळयाचे दिवसात मेळघाटासह अनेक गावात पाणी टंचाई भासते.या कालावधीत नागरिकांंना पिण्यासाठी पाणी पुरवठा करणे गरजेचे असते.अशावेळी जेही टॅकर पाणी पुरवठयासाठी लावले जातात.ते राजण्यापेक्षा सर्वसामान्यासाठी लावले जातात.परंतु हे करत असतांना टॅकरची मागणी करायची अन स्वत:चेच टॅकर लावावे अशा प्रकार होवू नये हेही तेवढेच महत्वाचे आहे.
शाम देशमुख
शिवसेना जिल्हाप्रमुख
बॉक्स
वर्ष टॅकर खर्च
२०१७-१८ १४ ४९.०० लाख
२०१८-१९ ७१ २.४८
२०१९-२९ २६ ९४.५०
२०२०-२१ १९ ६५.००