नांदगाव पोलिसांची आकसपूर्ण कारवाई

By admin | Published: April 26, 2015 12:25 AM2015-04-26T00:25:19+5:302015-04-26T00:25:19+5:30

ग्रामपंचायत निवडणुकीत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव येथे दोन गटांत पेटलेला वाद पोलिसांच्या आकसपूर्ण कारवाईमुळे पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

Negative action of Nandgaon police | नांदगाव पोलिसांची आकसपूर्ण कारवाई

नांदगाव पोलिसांची आकसपूर्ण कारवाई

Next

राजकीय दबाव : १०-१२ वीची मुलेही आरोपी
अमरावती/धानोरागुरव : ग्रामपंचायत निवडणुकीत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव येथे दोन गटांत पेटलेला वाद पोलिसांच्या आकसपूर्ण कारवाईमुळे पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे आहेत. पोलीस राजकीय दबावात केवळ आम्हालाच लक्ष्य करीत असल्याचा आरोप कोहळे गटाने केला आहे. याप्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोहळे गटातील काही महिला शनिवारी लोकमत कार्यालयात दाखल झाल्यात. पोलिसांची कारवाई एकतर्फी कशी आहे, याबाबत त्यांनी कैफियत मांडली. जिल्हा पोलीस अधीक्षकांना दाद मागण्यासाठी या महिला अमरावतीत आल्या होत्या. सर्वच पुरुषांना अटक करण्यात आली. आता महिलांनाही धमक्या सुरू आहेत, असा त्यांचा आरोप आहे.
धानोरा गुरव ग्रामपंचायतीची मतदान प्रक्रिया सुरु असताना २२ एप्रिल रोजी राजेंद्र पांडे यांच्या गटातील सदस्यांनी दुसऱ्या गटाचे प्रमोद कोहळे व शैलेश गुजांळ यांच्यावर हल्ला केला.

राजकीय हस्तक्षेप
स्थानिक लोकप्रतिनिधीने कोहळे गटातील सदस्यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला, असा आरोप कोहळे गटातील काही महिलांनी शनिवारी लोकमत कार्यालय गाठून केला. शनिवारी किशोर गुंजाळ व शरद गुजांळ यांना पोलिसांनी अटक केली असून कुटुंबीयातील दहावी, बारावीचे विद्यार्थी नैन गुजांळ व प्रेम गुजांळ यांनाही अटक करण्यासाठी पोलीस गावात गेले होते.

Web Title: Negative action of Nandgaon police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.