स्मशान भूमींच्या विकासाकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:14 AM2021-02-09T04:14:10+5:302021-02-09T04:14:10+5:30
अमरावती : बडनेरा नवीवस्ती वरूडा मार्गालगतच्या स्मशानभूमीच्या विकासाकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष चालविले आहे. आतमध्ये हिरवळ सुकली आहे. संरक्षण कुंपणाचे ...
अमरावती : बडनेरा नवीवस्ती वरूडा मार्गालगतच्या स्मशानभूमीच्या विकासाकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष चालविले आहे. आतमध्ये हिरवळ सुकली आहे. संरक्षण कुंपणाचे काम अतिशय नित्कृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. अंतर्गत रस्त्याची दैना झाली आहे. लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
-------------------
रविनगर चौकात रस्ते निर्मिती संथगतीने
अमरावती : येथील रविनगर चौकात सिमेंट रस्ते निर्मिती संथगतीने सुरू आहे. याच भागात शाळा, महाविद्यालये असल्यामुळे वर्दळ नित्याची असताना रस्ते निर्मितीची कामे वेगाने होत नसल्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही भागात रस्ता ओलांडून जावे लागत आहे.
-----------------------
तपोवन मार्गावर खडडे, नागरिक त्रस्त
अमरावती : तपोवन प्रवेशद्धार ते कुष्ठधाम या मार्गावर जागोजागी खडडे पडले आहे. या मार्गाच्या डागडुजी, दुरुस्तीकडे महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष चालविले आहे. या भागात नव्याने वसाहती तयार होत असताना मार्ग नादुरुस्त ही मोठी समस्या मानली जात आहे.
-------------------
रामपुरी कॅम्प ते डफरीन मार्गावर कचरा डेपो
अमरावती : स्थानिक रामपुरी कॅम्प ते डफरीन मार्गावर कचरा साठवून ठेवण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील रहिवासी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, कचरा रस्त्यालगत साठवून ठेवण्यात येत असल्यामुळे रस्त्यावरील घाण होत आहे.
------------------------
कॉटन मार्केट मार्गावर रस्त्यावर वाहने
अमरावती : येथील जुने कॉटन मार्केट मार्गावर रस्त्यावर वाहने उभे करण्यात येत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे, वाहतूक पोलिसांचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर हातगाड्या, किरकोळ विक्रेत्यांचीसुद्धा समस्याने नागरिक त्रस्त झाले आहे.