ना शाळा, ना परीक्षा थेट निकाल, दहावीच्या विद्यार्थ्यांची बल्ले बल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:11 AM2021-07-17T04:11:53+5:302021-07-17T04:11:53+5:30

अमरावती जिल्ह्याचा निकाल ९९.९७ टक्के, केवळ आठ विद्यार्थी नापास, ३८९६४ विद्यार्थी उत्तीर्ण अमरावती : गत दीड वर्षापासून कोरोना महामारीने ...

Neither the school, nor the direct results of the exam, the bat of the tenth graders | ना शाळा, ना परीक्षा थेट निकाल, दहावीच्या विद्यार्थ्यांची बल्ले बल्ले

ना शाळा, ना परीक्षा थेट निकाल, दहावीच्या विद्यार्थ्यांची बल्ले बल्ले

googlenewsNext

अमरावती जिल्ह्याचा निकाल ९९.९७ टक्के, केवळ आठ विद्यार्थी नापास, ३८९६४ विद्यार्थी उत्तीर्ण

अमरावती : गत दीड वर्षापासून कोरोना महामारीने शिक्षणक्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. परिणामी यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांची ना शाळा, ना परीक्षा, थेट ऑनलाईन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. निकालाची टक्केवारी ही डोळे दीपवून टाकणारी ठरली. शाळांनी मूल्यांकनाच्या आधारे जणू विद्यार्थ्यांवर गुणांचा वर्षाव झाला आहे, अशी टक्केवारीची यादी सांगते.

कोरोनामुळे ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरू होते. काही गुणी विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षांची जाेरदार तयारीदेखील केली होती. मात्र, राज्य शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि गुणी विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांवर विरजण पडले. नववीचे गुण, दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे शाळांनी निकाल जाहीर केला असला तरी जवळपास सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातून केवळ आठ विद्यार्थी नापास झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही, तेही शाळांच्या मेहरबानीने उत्तीर्ण झाले आहे. खऱ्या अर्थाने ‘ढ’ विद्यार्थ्यांना कोरोना पावल्याचे चित्र आहे.

------------------

यंदा दहावीचे पूनर्मूल्यांकन नाही

दहावीच्या निकालाने विद्यार्थी आनंदित आहेत. मात्र, यावर्षी पहिल्यांदा निकालानंतर पुनर्मूल्यांकन असणार नाही. परीक्षा झाली नाही. त्यामुळे पूनर्मूल्यांकन घेण्याचा प्रश्नच नाही. जिल्ह्याचा निकाल ९९.९७ टक्के लागला असून, शाळांमार्फत केवळ आठ विद्यार्थ्यांचे मूल्यांकनासाठी गुण बोर्डाकडे पाठविण्यात आले नाही.

---------------------

श्रेणी सुधारण्याची संधी

दहावीचा निकाल विद्यार्थ्यांसाठी उत्तम ठरला आहे. मात्र, गुणी विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निकाल अन्यायकारक मानला जात आहे. मात्र, अशा विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारण्याची संधी बोर्डाकडून देण्यात येणार आहे. पुढील दाेन परीक्षा देता येईल, असे बोर्डाने स्पष्ट केले.

---------------------

अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा

दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला आहे. आता राज्य शिक्षण मंडळाकडून अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऐच्छिक आहे. सीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी प्राधान्य असेल. सीईटी परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांंना दहावीच्या गुणांच्या आधारे अकरावीत प्रवेश दिला जाईल. सीईटी परीक्षा १०० गुणांची असेल. ईंग्रजी, गणित, सामाजिक शास्त्र, विज्ञान विषयावर १०० गुणांची ती घेण्यात येईल. ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांच्या आधारे सीईटी परीक्षा घेण्यात येईल, अशी माहिती शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

------------------

निकालावर एक नजर (नियमित विद्यार्थी)

एकूण विद्यार्थ्यांची नोंदणी : ३८९७३

मू्ल्यांकन झालेले विद्यार्थी : ३८९७२

उत्तीर्ण झालेले विद्यार्थी : ३८९६४

प्राविण्य श्रेणी : १६९७६

प्रथम श्रेणी : १८७०३

द्धितीय श्रेणी : ३२४४

उत्तीर्ण : ४१

नापास : ८

------------------

दहावीच्या ऑनलाईन निकालाने साईट क्रॅश

दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर होताच शिक्षण बोर्डाच्या साईटवर एकाचवेळी विद्यार्थ्यांनी भेट दिली. त्यामुळे संकेत स्थळ क्रॅश झाले. शुक्रवारी १ वाजता निकाल जाहीर होऊनही दुपारी २ पर्यंत विद्यार्थ्यांना नेमके काय झले, हे कळलेच नाही. एकाच वेळी १६ लाख विद्यार्थ्यांनी संकेत स्थळाला भेट दिल्याने ताण आल्याची माहिती आहे.

----------------

कोट

कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राची प्रचंड हानी झाली आहे. पर्यायाने विद्यार्थ्यांना ना शाळा, ना परीक्षा असा पहिल्यांदाच अनुभव आला. शासनाने दहावीची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. परिस्थितीनुसार तो योग्यही होता. मात्र, आता शासनाने शाळा सुरू करण्याबाबत धोरण निश्चित करावे.

- मधुकर अभ्यंकर, शाळा संचालक

--------

नववीचे गुण, दहावीचे अंतर्गत मूल्यमापन असे सूत्र अवलंबित एका कल्पकतेतून निकाल जाहीर झाला, तो वास्तवाला धरून आले. यात गुणी विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, असे म्हणता येणार नाही. कारण अकरावी प्रवेशासाठी सीईटी आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असा दुहेरी संगम निकालाने साधला आहे.

- शरद तिरमारे, मुख्याध्यापक

Web Title: Neither the school, nor the direct results of the exam, the bat of the tenth graders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.