वनमंत्र्यांनी सोबत नेला मेळघाटचा वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 10:02 PM2018-10-03T22:02:49+5:302018-10-03T22:03:07+5:30

मेळघाटच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे वने व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी चक्क मेळघाटचा वाघ सोबत नेला. त्या वाघाला हेलिकॉप्टरचा प्रवासही घडला. मोठ्या आदरातिथ्याने त्यांनी हा वाघ स्वीकारला. सोबतच मेळघाटच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही देत, पर्यावरणासाठी वाघ आवश्यक असून, तो वाचविण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आदेशही संबंधित अधिकाºयांना दिलेत. यासाठी निधी कमी पडणार नसल्याचे सांगितले.

Nela Melghat's Tiger along with the Forest Minister | वनमंत्र्यांनी सोबत नेला मेळघाटचा वाघ

वनमंत्र्यांनी सोबत नेला मेळघाटचा वाघ

Next
ठळक मुद्देप्रभूंची इच्छा पूर्ण होणार : गरिबी विकासाच्या आड येणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : मेळघाटच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे वने व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी चक्क मेळघाटचा वाघ सोबत नेला. त्या वाघाला हेलिकॉप्टरचा प्रवासही घडला. मोठ्या आदरातिथ्याने त्यांनी हा वाघ स्वीकारला. सोबतच मेळघाटच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही देत, पर्यावरणासाठी वाघ आवश्यक असून, तो वाचविण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आदेशही संबंधित अधिकाºयांना दिलेत. यासाठी निधी कमी पडणार नसल्याचे सांगितले.
बुधवारी सकाळी १०.४५ वाजता चिखलदरा पर्यटन स्थळावरील पोलीस परेड ग्राउंडवर ना.सुधीर मुनगंटीवार हेलिकॉप्टरमधून उतरले. येथील व्याघ्र प्रकल्पातर्फे आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. त्यानंतर वनविभाग, नगरपालिकेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन उद्घाटन त्यांनी केले. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशिक्षण केंद्राच्या पर्यटक ग्राउंडवर त्यांनी वनकर्मचाºयांची मानवंदना स्वीकारली. त्यावेळी त्यांचे वनाधिकाºयांनी पुष्पगुच्छ भेट वस्तू प्रतिकृती देऊन मानसन्मान व स्वागत केले. भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प १९७३ साली मेळघाटात उघडल्याचे त्यांना सांगण्यात आले. राज्यात घुबडांच्या एकूण संख्येपैकी सर्वाधिक मेळघाटच्या जंगलात असल्याचे सांगण्यात आले. व्याघ्र प्रकल्पाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी, जननी योजनेअंतर्गत युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येणाºया १४ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न त्यासाठी आवश्यक निधी वनचराई, अतिक्रमण, वन प्रशिक्षण केंद्राचे नूतनीकरण व जागतिक स्तरावर दर्जा, मोहाफुलापासून उत्पादन, खवा निर्मितीतून रोजगार आदी विविध प्रश्न मांडण्यात आले.

वाघाचा फोटो अन् प्रतिकृती भेट
ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वागतानंतर आठवणीची भेट म्हणून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक श्रीनिवास रेड्डी यांनी वाघाची प्रतिकृती भेट दिली. आनंदाने मेळघाटचा हा वाघ वनमंत्र्यांनी स्वीकारला. प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांनी वाघांचा फोटो वनमंत्र्यांना दिला. मेळघाटच्या या वाघाच्या प्रतिकृतीचा प्रवास हेलिकॉप्टर पूर्ण झाला.

विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य
सर्वांना प्रभूजवळ आपले मागणे मागावे लागते. मात्र, मेळघाटात आल्यावर आमदार प्रभूप्रभुदास भिलावेकर यांनी अनेक प्रश्न आणि मागण्या मांडल्या. सर्व मागण्या आपण पूर्ण करणार असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. अर्थमंत्री म्हणून येथील विकासाबद्दल त्यांची कुठेच अडवणूक नसल्याचे ते म्हणाले.

Web Title: Nela Melghat's Tiger along with the Forest Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.