ेअस्ताव्यस्त पार्किंगसाठी व्यापाºयांची कानउघाडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 11:27 PM2017-09-26T23:27:25+5:302017-09-26T23:28:39+5:30
पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सोमवारी रात्री जयस्तंभ चौक ते जवाहर गेट मार्गावर पायी गस्त घालून अस्तव्यस्त पार्किंगसाठी व्यापाºयांची कानउघाडणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी सोमवारी रात्री जयस्तंभ चौक ते जवाहर गेट मार्गावर पायी गस्त घालून अस्तव्यस्त पार्किंगसाठी व्यापाºयांची कानउघाडणी केली. पुन्हा अस्तव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण केल्यास व्यापाºयावर सक्त कारवाई करा, असे सक्त निर्देश सीपींनी कोतवालीच्या ठाणेदारांना दिले आहेत.
शहरातील मुख्य बाजारपेठेत सद्यस्थितीत वर्दळ वाढली आहे. सण उत्सवाच्या पर्वामुळे बहुतांश नागरिक बाजारपेठेत खरेदीसाठी येत आहेत. अशाप्रसंगी व्यापारी प्रतिष्ठानांसमोरील पार्किंग व्यवस्थेचा बोजबारा उडाल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. सीपींनी रात्री जयस्तंभ चौकापासून पायी गस्त घालण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना जवाहर गेटकडे जाणाºया मार्गावरील व्यापारी प्रतिष्ठानांसमोर अस्तव्यस्थ स्थितीत वाहने पार्क केली असल्याचे निदर्शनास आले. यावेळी ठाणेदार मनीष ठाकरे यांना नो-पार्किंग झोनमध्ये येणाºया वाहनांवर कारवाई करण्यास निर्देश दिलेत. काही व्यापाºयांना बोलावून त्यांना पार्कींगसंदर्भात शिस्त राखण्याचे सक्त निर्देश दिलेत. पुन्हा पार्किंगमधील वाहने अस्तव्यस्त स्थितीत आढळली, तर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्तांनी व्यापाºयांना दिला. पायी गस्तीदरम्यान अनेक व्यापाºयांची साहित्य प्रतिष्ठानांबाहेर ठेवल्याचेही सीपींच्या लक्षात आले. मुख्य मार्गावरच अनेकांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या अनधिकृत पार्किंगविषयी सतर्क राहून कारवाई करा, असा इशारा सीपींनी ठाणेदारांना दिला.
गस्तीदरम्यान पोलिसांनी जयस्तंभ चौकातील एका हॉटेलसमोरून विनाक्रमाकांच्या चार दुचाकी व चार सायकल 'डिटेन' केल्या आहेत. तसेच काही नागरिकांनी रस्त्यावरच दुकान थाटल्याचे आणि ते सर्व साहित्य गुंडाळून ठेवल्याचे दिसून आले. ते साहित्य पोलिसांनी जप्त केले. त्याचप्रमाणे प्रभात टॉकीजजवळ सुरु असणाºया बांधकामस्थळी रस्त्यावरच गिट्टी व रेती आणून टाकल्याचे सीपींच्या निदर्शनास आले. यासंदर्भात कारवाईचे अधिकार महापालिका प्रशासनाला असताना पोलिसांनीच वाहतुकीच्या दृष्टीने गिट्टी व रेती हटविण्यास संबंधित इमारत मालकास सांगितले.
शहरातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढली आहे. अशाप्रसंगी व्यापारी प्रतिष्ठानासमोरील रस्त्यावरील अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यासंबंधाने व्यापाºयांना शिस्तीत वाहने लावण्याचे निर्देश दिले आहे.
- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त