रासायनिक विज्ञान विषयावर नेट-सेट कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 11:42 PM2018-02-02T23:42:13+5:302018-02-02T23:42:35+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागात विद्यार्थ्यांकरिता रासायनिक विज्ञान विषयावर नेट-सेट कार्यशाळा संपन्न झाली.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागात विद्यार्थ्यांकरिता रासायनिक विज्ञान विषयावर नेट-सेट कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कार्यशाळेचे समन्वयक तथा रसायनशास्त्र विभागप्रमुख आनंद अस्वार, तर मार्गदर्शक म्हणून लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठातील जेष्ठ प्राध्यापक पी.एस. कलसी होते. व्यासपीठावर मनिषा कोडापे, रसायनशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष पायल टाले उपस्थित होते. पी.एस. कलसी यांनी रसायनशास्त्र विषयातील स्टीरीयोकेमेस्ट्री व स्पेट्रोस्कोपी या महत्वाच्या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. पाहुण्यांचा परिचय मनीषा कोडापे यांनी दिला.. संचालन पायल हुंडाई व आभार प्रदर्शन जागृती बारब्दे यांनी केले. कार्यशाळेसाठी रसायनशास्त्र मंडळाची अध्यक्ष पायल टाले, सचिव सागर रेवाडे, कोषाध्यक्ष रुपाली जाधव, युसूफ भिमाणी आदी उपस्थित होते.