वनविभागाला मिळाली ‘नेटगन’
By admin | Published: August 13, 2016 12:02 AM2016-08-13T00:02:19+5:302016-08-13T00:02:19+5:30
वन्यजिव पकडण्यासाठी शिकारी प्रतिबंधक पथकाला नुकतीच नेटगन मिळाली.
वन्यप्राणी पकडण्यासाठी उपयोगी : रेस्क्यू पथकासाठी उपयुक्त
अमरावती : वन्यजिव पकडण्यासाठी शिकारी प्रतिबंधक पथकाला नुकतीच नेटगन मिळाली. शुक्रवारी या नेट गनसंदर्भात वडाळी वनविभाग कार्यालयात वनकर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
अमरावती सर्कलमधील शिकारी प्रतिबंधक पथक वन्यप्राण्यांना पकडण्यासाठी 'टेल इंजेक्ट गन'चा उपयोग करीत होते. वन्यजिवांना टेल इंजेक्ट गनद्वारे टॅग्यूलाईज करून बेशुध्द करण्यात येत होते. मात्र, आता वन्यजिवांना बेशुध्द न करता नेट गनद्वारे पकडण्यासाठी ही बंदूक अत्यंत उपयोगी ठारणार आहे. जखमी वन्यप्राणी ३० मीटर अंतरावर असताना त्यांच्यावर नेटगनद्वारे निशाणा साधणे व त्यांच्या अंगावर जाळे फेकण्याचे काम नेटगनव्दारे केले जाणार आहे. ही बंदूक डेनमार्कवरून बोलाविण्यात आली आहे. शुक्रवारी नेट गन चालविण्यासंदर्भात अमरावती व बुलढाणा येथील रेस्क्यू पथकाला प्रशिक्षण देण्यात आले आहे. मुख्य वनसरंक्षक संजीव गौड व उपवनसरंक्षक हेमंतकुमार मीना यांच्या मार्गदर्शनात दक्षता पथकाचे डीएफओ प्रमोद पंचभाई, आरएफओ एस.के. वाचगे, बुलडाण्याचे आरएफओ गजानन झोडे, वनरक्षक अमोल गावनेर व वन्यजीव अभ्यासक स्वप्निल सोनोने यांनी उपस्थित वनकर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
रेस्क्यू पथकाजवळ
'डॅन इंजेक्ट, नेटगन'
शिकारी प्रतिबंधक पथक जखमी अथवा चवताळलेल्या वन्यजिवांना पकडण्यासाठी २४ तास सज्ज असतात. अशा वन्यप्राण्यांची माहिती मिळताच वनकर्मचारी 'डॅन इंजेक्ट व नेटगन घेऊन तत्काळ घटनास्थळी पोहचतात. आवश्यकता भासल्यास 'डॅन इंजेक्टद्वारे वन्यप्राण्यांला डॉट मारून बेशुध्द करून पकडतात. मात्र, आता नेटगनचा उपयोग करून वन्यजिवांना पकडण्यात येणार आहे.