जिल्ह्यात नवे १५ उद्योग

By admin | Published: December 6, 2015 12:04 AM2015-12-06T00:04:35+5:302015-12-06T00:04:35+5:30

पंचतारांकित नांदगाव एमआयडीसीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये ८ उद्योग आले आहेत.

New 15 industries in the district | जिल्ह्यात नवे १५ उद्योग

जिल्ह्यात नवे १५ उद्योग

Next

प्रवीण पोटे : सहा महिन्यांत बेलोऱ्यातून ‘टेक आॅफ’
अमरावती : पंचतारांकित नांदगाव एमआयडीसीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये ८ उद्योग आले आहेत. आणखी १५ उद्योग येणार आहेत. लवकर हे उद्योजक पाहणी करणार आहेत. यामध्ये यवतमाळच्या रेमंड उद्योगाही समावेश आहे. या उद्योगांना शासन सवलती देणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात मुंबईला बैठक पार पडली असल्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले.
अमरावती व कोल्हापूर शहराचा विकास सारखाच झाला. परंतु कोल्हापूर विकासात खूप पुढे गेले, अमरावती मात्र माघारले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारात शहरात ६५० कोटी रूपयांची विकास कामे होणार आहेत. विकास हा सार्वजनिक असावा यात कुठलेही राजकारण नसावे, असे पालकमंत्री म्हणाले.
बेलोरा, अकोला व चंद्रपूर येथून एटीआर व अन्य विमानांचे ६ महिन्यांत ‘टेक आॅफ’ होईल या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. यासाठी १३० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये धावपट्टी बदलणे, टॉवर लाईन अन्यत्र हलविणे आदी कामे होणार आहेत.
सिंचनाचे ४० प्रोजेक्ट मार्गी लागले आहेत. काही रखडलेले प्रकल्प लवकर मार्गी लागणार आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी विजेची समस्या होती ती मार्गी लागली आहे. आतापर्यंत १०० नवीन रोहीत्र बसविण्यात आलेले आहेत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

‘पालकमंत्री पांदण रस्ते विकास अभियान’
राज्यात पायलट प्रोजेक्ट ठरावा, ही संकल्पना

‘पालकमंत्री पांदन रस्ते विकास अभियान’ याअंतर्गत जिल्ह्यातील अडीच हजार पांदन रस्ते निर्मितीचे ‘लक्ष्य’ आहे, जिल्ह्यात ४ हजार पांदण रस्ते आहेत. दोन आठवड्यांत २०० रस्त्यांची कामे मार्गी लागली आहे. जिल्ह्यात ५२५ तलाठी आहे. प्रत्येकांना ५ रस्त्याचे टार्गेट दिले आहे. यासाठी महसूल विभागाच्या उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी यांची कार्यशाळा आपण घेतली. ग्रामीण भागात हे रस्ते ‘लाईफ लाईन’ आहे. हे सर्व रस्ते अतिक्रमण मुक्त करून मातीकामच नव्हे तर खडीकरण करण्यात येणार आहे. हे अभियान राज्यासाठी पायलट प्रोजेक्ट ठरावा, अशी आपली संकल्पना असल्याचे ना. पोटे यांनी सांगितले.

प्रत्येक नगरपंचायतींना देणार ६० लाख
जिल्ह्यात नव्याने नगरपंचायती स्थापित झाल्यात. यांना शासनाचा निधी नसतो. यासाठी आपण वेगळी योजना आखली आहे. त्या अंतर्गत या नगरपंचायतींना विकासासाठी प्रत्येकी ६० लाख देणार आहेत. प्रत्येक नगरसेवकाला ५ लाखांचा विकास निधी देणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

आतापर्यंत ७८ हजार नागरिकांशी संपर्क
पालकमंत्री झाल्यानंतर दर शनिवारी, रविवारी शासकीय विश्रामगृहात आपण नागरिकांना उपलब्ध असतो. आतापर्यंत ७८ हजार नागरिकांना भेटलो असून त्यांच्या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे, असे ना.पोटे यांनी सांगितले.

५० हजार युवकांना रोजगार निर्मिती
जिल्ह्यात नव्याने उद्योग येत आहेत. यामध्ये किमान ५० हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यासाठी कुशल व अकुशल कामगार तयार करणे, प्रशिक्षण देणे यासाठी ना. रणजित पाटील यांच्या सहकार्याने प्रयत्न सुरू आहेत, असे पोटे यांनी सांगितले.

Web Title: New 15 industries in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.