सर्व बँकांत नवीन ‘करन्सी’ उपलब्ध

By admin | Published: November 10, 2016 12:05 AM2016-11-10T00:05:22+5:302016-11-10T00:05:22+5:30

केंद्र शासनाने ८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीपासून देशात ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला.

New banks available in all banks | सर्व बँकांत नवीन ‘करन्सी’ उपलब्ध

सर्व बँकांत नवीन ‘करन्सी’ उपलब्ध

Next

विभागीय आयुक्त : बँकांनी अतिरिक्त काऊंटर्सची सुविधा द्यावी
अमरावती : केंद्र शासनाने ८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीपासून देशात ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार जिल्ह्यात सर्व बँकांमध्ये ५०० व १००० रूपयांच्या नवीन चलनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेनुसार जुन्या नोटा बदलून मिळतील. तसेच बँक खात्यातून रक्कम काढण्यासाठीही नवीन चलन उपलब्ध राहणार आहे. नागरिकांनी संयम बाळगून बँकांना तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त गुप्ता यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली नवीन चलनासंदर्भात आयोजित बैठकित मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्हाधिकारी किरण गित्ते, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण तसेच बँक, पेट्रोल पंप, रुग्णालय, रेल्वे, पोस्ट आॅफीस, गॅस वितरक उपस्थित होते.
विभागीय आयुक्त गुप्ता म्हणाले, केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे सर्वांना त्यांच्या खात्यात जुन्या नोटा जमा करण्यास मर्यादा नाही. इतरांच्या खात्यात जमा करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक राहिल. ३० डिसेंबरपर्यंत बँक व पोस्ट खात्यातून जुन्या नोटा बदलून मिळतील. या मर्यादेनंतर ३१ मार्च २०१७ पर्यंत विलंबाचे कारण, पुरावे आणि शपथपत्र भरुन रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात नोटा जमा करता येतील. ५०० व १००० रुपयांच्या नोटा रेल्वे, विमानतळ, सरकारी बसस्थानक, खासगी रूग्णालये, औषधी दुकानांमध्ये ११ आणि १२ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. संबंधितांनी नागरिकांची अडवणूक करु नये. सध्याची परिस्थिती लक्षात घेता बँकांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन बँक प्रशासनाने आपापल्या शाखेत जादा काऊंटर उघडावेत व जादा वेळ व्यवहार करून ेग्राहकांना सुविधा द्याव्यात. पेट्रोल पंप, रूग्णालय, बस स्थानक आदींकडून येणारी रक्कम स्वीकारण्यासाठी त्यांना अग्रक्रम द्यावा, अशा सूचना केल्या.

नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी
यावेळी विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना पोलीस प्रशासनास केल्या. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस नियंत्रण कक्षाची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. अमरावती शहर ०७२१ -२५५१०००आणि २५५०६१२ तर अमरावती ग्रामीण ०७२१-२६६५०४१, जिल्हाधिकारी कार्यालय ०७२१- २६६२०२५ हे क्रमांक देण्यात आले आहेत. ज्या-ज्या बँकांना पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता भासेल, त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधावा. पेट्रोल पंप, हॉस्पिटल, दूध केंद्र आदी ठिकाणी अत्यावश्यक सेवा चालू राहतील. विद्युत विभागानेही विशेष करुन बँक कार्यालयाच्या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. गरजेनुसार मोठ्या बँक शाखेत जादा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करण्यात येणार आहे.

मर्यादेप्रमाणे जुन्या नोटा बदलून नव्या मिळणार
बँक खात्यात जुने चलन भरण्यासाठी मर्यादा नाही
स्वतंत्र हिशेब ठेवा
जिल्हाधिकारी किरण गित्ते बँक व्यवस्थापकांना मार्गदर्शन करताना म्हणाले, सर्व बँकांनी जुन्या नोटा, खात्यातून काढलेली रक्कम, जमा होणारी रक्कम याचा स्वतंत्र हिशेब ठेवावा. जिल्ह्यात किती रकमेच्या जुन्या नोटा बदलून वितरित करण्यात आल्यात आणि नवे चलन याबाबतची माहिती ठेवावी. तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवावा. गरजेनुसार होमगार्डची सेवाही घ्यावी. पोलीस विभागातर्फे स्पेशल युनिटची सोय करण्यात आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या परिसरात वाढीव बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title: New banks available in all banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.