ऑनलाईन फसवणुकीत नवख्या ‘क्रिप्टोकरन्सी’ची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:17 AM2021-09-04T04:17:09+5:302021-09-04T04:17:09+5:30

लोकमत विशेष प्रदीप भाकरे अमरावती : सायबर गुन्हेगार लोकांना अनेक प्रकारची प्रलोभने देऊन आर्थिक फसवणूक करत आहेत. त्याच मालिकेत ...

New ‘cryptocurrency’ fumes in online fraud | ऑनलाईन फसवणुकीत नवख्या ‘क्रिप्टोकरन्सी’ची धूम

ऑनलाईन फसवणुकीत नवख्या ‘क्रिप्टोकरन्सी’ची धूम

Next

लोकमत विशेष

प्रदीप भाकरे

अमरावती : सायबर गुन्हेगार लोकांना अनेक प्रकारची प्रलोभने देऊन आर्थिक फसवणूक करत आहेत. त्याच मालिकेत क्रिप्टोकरन्सी घोटाळा सध्या तेजीत आहे. सायबर गुन्हेगार लोकांना क्रिप्टोकरन्सी (बिटक्वाॅइन, इथरियम इ. ) मध्ये रक्कम अदा करण्यास सांगून लोकांची फसवणूक करतात. अमरावती शहरात अशा घटनांची नोंद नसली, तरी शहर आयुक्तालयातील सायबर शाखेने नागरिकांना सजगतेचे आवाहन केले आहे.

मोठमोठ्या शहरात क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक योजना घोटाळा. बनावट क्रिप्टोकरन्सी ॲप्लिकेशन्स, बनावट क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग, गुंतवणूक संकेतस्थळ असे विभिन्न प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी घोटाळयाच्या घटना घडत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भारतात क्रिप्टोकरन्सी लोकप्रिय ठरत आहे. अनेक किरकोळ गुंतवणूकदारही क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत आहे. सध्या क्रिप्टोकरन्सीमध्ये बिटकॉईन, ट्रोन, इथेरियम आणि रिपल हे ट्रेंडीगमध्ये दिसून येत आहेत. अलिकडच्या काळात बर्याच मोठ्या क्रिप्टोकरन्सीजमध्ये घट पाहायला मिळत होती. त्यामुळे आभासी चलनात गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबद्दल रिसर्च करा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. क्रिप्टोकरन्सीबाबत काही तांत्रिक ज्ञान आणि संशोधन असणे गरजेचे आहेत, तसेच गुंतवणूकदार म्हणून तुम्ही ज्यात गुंतवणूक करणार आहात, त्याचे भविष्य नेमके काय, हे पाहणे देखील महत्त्वाचे असल्याचे सायबर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

बाॅक्स

सुरक्षा आणि खबरदारी

आपले डिजिटल चलन वाॅलेट, सुरक्षित ठेवा. आपले डिव्हाइस सुरक्षित ठेवा, ॲंटीव्हायरस वापरा. फायरवाॅल सेटिंग्ज सक्षम करा. गुंतवणुकीच्या कामासाठी सार्वजनिक वाय-फायचा वापर टाळा. प्रमाणीकरण अधिक सक्षम करा. क्रिप्टोकरन्सीमध्ये काळजीपूर्वक गुंतवणूक करावी. सर्व बाबींवर नीट लक्ष देऊन त्यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला कमीत कमी नुकसान होऊ शकते. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्याही गुंतवणूकदाराने त्याचा हेतू काय, त्याला दीर्घकाळात गुंतवणूक केल्याने काय फायदा होऊ शकतो, याचा अभ्यास केला पाहिजे.

/////////

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?

क्रिप्टोकरन्सी एक डिजीटल चलन आहे. रुपये किंवा डॉलर्सप्रमाणे हे चलन प्रत्यक्ष हातात घेता येत नसले तरी या पैशातून वस्तू खरेदी करता येते. क्रिप्टोकरन्सी पूर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे त्याचा गैरवापर आणि फ्रॉड होण्याची शक्यताही असते.

///////////

कोट

अमरावती शहर आयुक्तालयात ‘क्रिप्टोकरन्सी’बाबतच्या गुन्ह्याची नोंद नाही. मात्र, राज्य

पातळीवरून त्याबाबत सजगतेचे आवाहन करण्यात आले आहे. त्याबाबतची अमरावती शहर पोलिसांच्या फेसबुक वॉलवर जनजागूतीपर पोस्ट देखील टाकण्यात आली आहे.रवींद्र सहारे, सहायक पोलीस निरिक्षक

सायबर पोलीस स्टेशन, अमरावती

Web Title: New ‘cryptocurrency’ fumes in online fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.