नवीन नोंदणीत स्त्री मतदारांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2016 12:17 AM2016-01-25T00:17:38+5:302016-01-25T00:17:38+5:30

जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत मतदार नोंदणीच्या विशेष ड्राईव्हमध्ये १ जानेवारीपर्यंत ३१ हजार ४६१ नवीन मतदारांची नोंदणी झाली.

New entry to increase female voters | नवीन नोंदणीत स्त्री मतदारांची वाढ

नवीन नोंदणीत स्त्री मतदारांची वाढ

Next

जिल्ह्यात २२ लाख ५९ मतदार : ६,१५९ मतदारांना यादीमधून वगळले
अमरावती : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत मतदार नोंदणीच्या विशेष ड्राईव्हमध्ये १ जानेवारीपर्यंत ३१ हजार ४६१ नवीन मतदारांची नोंदणी झाली. त्यामध्ये स्त्री मतदारांची संख्या अधिक आहे. यामुळे जिल्ह्याची मतदारसंख्या २२ लाख ५९ हजार २६४ एवढी झालेली आहे.
नवीन मतदार नोंदणीमध्ये जिल्ह्यात ३१ हजार ४६१ अर्जांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये १५ हजार १३७ पुरुष व १६ हजार ३२४ स्त्री मतदार आहेत. यासाठी ३१ हजार ४७९ अर्ज दाखल होते. या नोंदणीमध्ये ५ हजार ६१० आक्षेप नोंदविण्यात आलेत. यामध्ये ५ हजार ५०१ आक्षेप निकाली काढण्यात आलेत. यामध्ये २ हजार ९५९ पुरुष व २ हजार ५४२ स्त्री मतदार आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २२ लाख ५९ हजार २६४ मतदारांमध्ये ११ लाख ७६ हजार २८३ पुरुष व १० लाख ८२ हजार ९८१ स्त्री मतदार आहेत. मतदारसंघनिहाय धामणगाव विधानसभा मतदारसंघात १ लाख ४५ हजार ७५७, बडनेरा १ लाख ५७ हजार २४२, अमरावती १ लाख ४३ हजार ३३९, तिवसा १ लाख ३४ हजार ५४५, दर्यापूर १ लाख ३२ हजार ४३१, मेळघाट १ लाख २२ हजार ३३७, अचलपूर १ लाख १९ हजार ६१३ व मोर्शी मतदारसंघात १ लाख २७ हजार ७१७ मतदार आहेत.
प्रारूप मतदार यादीत २२ लाख ३३ हजार ९७८ मतदार आहेत. यामध्ये ११ लाख ६४ हजार ४३० पुरूष व १० लाख ६९ हजार ५३२ स्त्री मतदार आहेत. यामध्ये मागील मतदार यादीत २५ हजार ३०२ मतदारांची वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)

नवीन नोंदणीमध्ये
स्त्री मतदारांची संख्या अधिक
मतदार नोंदणीच्या विशेष अभियानात जिल्ह्यात ३१ हजार ४६१ नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये पुरुषापेक्षा स्त्री मतदार अधिक आहे. १६ हजार ३२४ स्त्री मतदार व १५ हजार १३७ पुरूष मतदार आहे. सर्वाधिक ३७०० स्त्री मतदारांची नोंदणी अमरावती मतदारसंघात झालेली आहे.

Web Title: New entry to increase female voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.