नव्या ढंगात जुन्या गाण्यांची मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 10:35 PM2018-03-18T22:35:35+5:302018-03-18T22:35:35+5:30
येथील पहाट परिवारतर्फे हिंदू नववर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ पाडवा पहाटचा सांस्कृतिक कार्यक्रम रविवारी सकाळी सात वाजता सांस्कृतिक भवनात पार पडला.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : येथील पहाट परिवारतर्फे हिंदू नववर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ पाडवा पहाटचा सांस्कृतिक कार्यक्रम रविवारी सकाळी सात वाजता सांस्कृतिक भवनात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला नववर्षाचे प्रतिक म्हणून अर्चना-हेमंत पवार या दाम्पत्याच्या हस्ते गुढीपूजन करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून आयुक्त हेमंत पवार, अनंत गुढे, सुरेखा लुंगारे, अनिल अग्रवाल आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची केंद्रीय संकल्पना ‘हर दिल जो प्यार करेगा’ यावर बेतलेली होती. यामध्ये १९६० च्या दशकातील ‘कह दु तुम्हे या चुप रहु...’ यापासून तर १९६० च्या दशकातील उडत्या चालीची गाणी ‘लेकर हम दिवाना दिल...’ थेट अगदी आजच्या ताज्या दमाची सुद्धा सादर करण्यात आली. यामध्ये बाल कलावंत विनम्र काळे, मनोहरलाल, धनश्री बनसोड, रोमहर्षक बुजरुक, राजश्री पाटील, नव्या ढंगात जुनी गाणी सादर करण्यात वकुब असणारे कामिनी खैरे, श्रीकृष्ण चिमोटे यांनी रंगत आणली.
वाद्य वदनात प्रिती मिश्रा, अभिषेक श्रीवास्तव यांनी आपली सुरेश गित सादर केलीत. सोबतच ज्योत्ना शेटे, शुभांगी देशमुख, चंद्रकांत पोपट, मनोहर शेगोकार, सुरेखा त्यागी, धर्माळे, रंजना मामर्डे, राजेश किल्लेकर, विरभान झामनानी यांनी रंगत आणली.
नृत्य अविष्कारमध्ये बाल कलावंत सर्व वयोगटातील मंडळींनी एकल समूह तसेच जोडीदारांसह भाग घेतला. यामध्ये प्रीती बुजरूक, मिश्रा, किरण बनसोड, सुधीर मोरे, विक्रम मामर्डे, नितीन बोबडे, कविता विधळे, ओमप्रकाश, प्रतिमा मलीक्का जयस्वाल यांनी रंगत चढवली.
एकल नृत्यात शीतल चौधरी, आशा हरवानी यांच्या लयबद्ध नृत्याने दिवंगत श्रीदेवी यांना श्रद्धांजली अर्पण केली. संचालन किरण बनसोड, कविता विधळे, मोनिका उमक यांनी केले. तसेच नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी नितीन अबुदानी यांनी सांभाळली.