कपाशीवर नवीन लष्करी अळीचा अटॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 06:00 AM2019-10-31T06:00:00+5:302019-10-31T06:00:36+5:30

अंडी अवस्थेतील कीड नियंत्रणासाठी ट्रायकोड्रामा या परोपजिवी किटकांचे शेतात प्रसारण करावे अथवा कापूस पिकांच्या पानांस ट्रायकोकार्ड लावावे. नवीन लष्करी अळीवरील परोपजिवी व परभक्षी किटकांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी किडीच्या सुरुवातीच्या अवस्थेत कडुनिंबावर आधारित कीटकनाशकांचा वापर करावा. प्रादुर्भावग्रस्त पिकांचे अवशेष नष्ट करावेत.

New military alley attack on cotton | कपाशीवर नवीन लष्करी अळीचा अटॅक

कपाशीवर नवीन लष्करी अळीचा अटॅक

Next
ठळक मुद्देएकात्मिक कीड व्यवस्थापन महत्त्वाचे : विभागीय कृषी सहसंचालकांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यासह विभागातील कपाशीवर नवीन लष्करी अळींचा प्रादुर्भाव झाला आहे. यासाठी केंद्र शासनाने एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती सुचविलेली आहे. याचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
शेतात नियमितपणे निरीक्षणे आणि देखरेख करून एकात्मिक कीड व रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. कपाशीची प्रादुर्भावग्रस्त फुले व हिरवी बोंडे त्वरित वेचून अळ्यासहित नष्ट करावीत. जेणेकरून, अळीचा होणारा प्रसार रोखण्यास मदत होईल. कीडीचे वेळेत व्यवस्थापनासाठी अंडीपुंज असलेली पाने तसेच सुरुवातीच्या अवस्थेतील अळ्या हाताने गोळा करून नष्ट कराव्यात.
अंडी अवस्थेतील कीड नियंत्रणासाठी ट्रायकोड्रामा या परोपजिवी किटकांचे शेतात प्रसारण करावे अथवा कापूस पिकांच्या पानांस ट्रायकोकार्ड लावावे. नवीन लष्करी अळीवरील परोपजिवी व परभक्षी किटकांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी किडीच्या सुरुवातीच्या अवस्थेत कडुनिंबावर आधारित कीटकनाशकांचा वापर करावा. प्रादुर्भावग्रस्त पिकांचे अवशेष नष्ट करावेत. प्रौढ नर पतंग नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. मुख्य शेत तणविरहीत ठेवणे, तसेच आजूबाजूचे क्षेत्र स्वच्छ ठेवावे.
कीटकनाशक नोंदणी समितीने मंजूर केलेल्या शिफारशीप्रमाणे नोंदणीकृत कीटकनाशकांचा वापर करावा. कापूस एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याप्रमाणे उपाययोजना कराव्यात. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांनी शिफारस केल्याप्रमाणे कापूस पिकांवर मेटाºहायझियम अ‍ॅनिसोप्ली किंवा नोमेरिया रिलाई या कीडरोगजनक बुरशीचा ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे महत्त्वाचे आहे.

असे करा व्यवस्थापन
नागपूर स्थित केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या शिफारशीनुसार प्रादुभावग्रस्त कापूस पिकांचे पुढील नुकसान टाळण्याच्या दृष्टीने त्यावर स्पिनेटोरम ११.७ टक्के एस.सी., ०८ मिली किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल १८.५ टक्के एस.सी., ०.३ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोक्टीन ५ टक्के एसजी ०.४ ग्रॅम किंवा इमामेक्टीन बेन्झोएट १.९ टक्के ईसी १.१६ मिली या कीटकनाशकांची प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

८० पिकांवर कीडींची उपजिविका
नवीन लष्करी अळी (फॉल आर्मीवर्म) या किडीचे मका हे मुख्य खाद्य असले तरीही ते पीक शेतातून काढून टाकल्यास किंवा ते पीक वाढीच्या शेवटच्या टप्प्यात असल्यास त्यांची पसंती कमी होऊन या कीडीचा कपाशी, बाजरी व इतर पर्यायी पिकांवर प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. ही कीड सुमारे ८० पिकांवर उपजिविका करीत असल्याने खरिपातील मका पीक काढल्यानंतर ती आजूबाजूच्या इतर पिकांवर स्थलांतरित होऊ शकते.

Web Title: New military alley attack on cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.