मक्यावर नवीन लष्करी अळींचा अटॅक, खरिपासाठी धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 01:35 AM2019-06-14T01:35:52+5:302019-06-14T01:37:38+5:30

मका पिकावर नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत आहे. या किडीचे मूळस्थान संयुक्त संस्थाने (यू.एस.ए.) ते अर्जेन्टिना या उत्तर व दक्षिण अमेरिका खंडातील आहे. मात्र धान्याच्या आयात-निर्यातीतून पतंगाद्वारे स्थलांतरणातून ही कीड आली असावी, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

New military lane attack on maize, dangerous for Khiri | मक्यावर नवीन लष्करी अळींचा अटॅक, खरिपासाठी धोक्याचा

मक्यावर नवीन लष्करी अळींचा अटॅक, खरिपासाठी धोक्याचा

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांसमोर नवे संकट : एकात्मिक व्यवस्थापन महत्त्वाचे, कृषी शास्त्रज्ञांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मका पिकावर नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत आहे. या किडीचे मूळस्थान संयुक्त संस्थाने (यू.एस.ए.) ते अर्जेन्टिना या उत्तर व दक्षिण अमेरिका खंडातील आहे. मात्र धान्याच्या आयात-निर्यातीतून पतंगाद्वारे स्थलांतरणातून ही कीड आली असावी, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. भारतात मे २०१८ मध्ये कर्नाटक राज्यात या लष्करी अळीची नोंद झाली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये सोलापूर जिल्ह्यात त्यानंतर नांदेड, हिंगोली व आता बुलडाणा जिल्ह्यातील मक्यावर या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. ही अळी या खरीप हंगामासाटी नवे संकट असल्याने एकात्मिक व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याची माहिती प्रादेशिक संशोधन केंद्र येथील कीटकशास्त्रज्ञ डॉ.अनिल ठाकरे यांनी दिली.
ओळख
पतंग : या पतंगाचे समोरील पंख करड्या व तपकिरी रंगाचे असून पंखाच्या टोकाकडे आणि मध्यभागी पांढरे ठिपके असतात. या पतंगाचे मागील पंख चमकदार पांढरे असतात. ती निशाचर असून संध्याकाळी मिलनासाठी जास्त सक्रिय असतात.
अंडी : पूर्ण वाढलेली अळी ३.१ ते ३.८ सेंमी लांब असते. अळीचा रंग फिक्कट हिरवा ते जवळपास काळा असतो. पाठीवर फिक्कट पिवळ्या रंगाचा तीन रेषा असतात. डोक्यावर उलट्या इंग्रजी ‘वाय’ आकारासारखे चिन्ह असते. कडेने लालसर तपकिरी पट्टा, शरीरावर काळे ठिपके असतात.
कोष : कोष लालसर तपकिरी रंगाचे असतात.
निरीक्षणे : अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मका पिकात दिसून आला. ही किड सहजपणे ओळखायची लक्षणे म्हणजे किडीच्या डोक्यावर उलट ‘वाय’ आकाराची खुण दिसून येते. तिच्या शरीराच्या (पोटाच्या) आठव्या सेगमेंटवर चार काळ्या रंगाचे ठिपके चौकोणी आकारात दिसून येतात. शरीराच्या वरच्या बाजूस फोड आल्यासारखे (उंचवट्यासारखे) काळे ठिपके दिसून येतात. त्यामध्ये लाल काळ्या रंगाचे केस दिसून येतात. पोंग्याच्या अवस्थेत या किडीचा प्रादुर्भाव असल्यास पानावर एका रांगेत छिद्रे दिसतात.
नुकसानीचा प्रकार :- या किडीची अळी अवस्था पिकांना नुकसान पोहचविते. सुरूवातीच्या अवस्थेतील अळ्या पानाचा हिरवा भाग खरडून खातात. त्यामुळे पानावर पांढरे चट्टे दिसतात. मोठ्या अळ्या पाने कुरतडून खातात. त्यामुळे पानांना छिद्रे दिसतात. अळी पोंग्यामध्ये शिरून आतला भाग खाते. पानाला छिद्रे व पोंग्यामध्ये अळीची विष्ठाही चिन्हे या अळीच्या प्रादुर्भावाची लक्षणे आहेत. या किडीच्या प्रादुर्भावामुळे ३० ते ६० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येते.
खाद्य वनस्पती : ही बहुभक्षी कीड आहे. ही कीड ८० च्यावर तृणधान्ये, तेलवर्गीय व भाजीपाला पिकावर उपजिविका करते. या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मका, भात, ज्वारी, ऊस व बर्मुडा गवतावर होतो. याशिवाय सोयाबीन, कापूस, भुईमूग, कांदा, टोमॅटो, कोबीवर्गीय, भाजीपाला, भोपळा वर्गीय भाजीपाला इत्यादी पिकांवर उपजिविका करते.

कीटकनाशके
सर्वेक्षणाअंती सरासरी ५ टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळल्यास १० लिटर पाण्यात डायमेथोएट ३० टक्के १२.५ मिली. किंवा थायमेथोक्झाम १२.६ टक्के + लॅम्बडासायहॅलोथ्रीन ९.५ टक्के झेडसी २.५ मिली किंवा क्लोरॅनट्रॅनिलीप्रोल १८.५ टक्के एस.सी. ३.०० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कार्बोफ्यूरॉन ३ टक्के दाणेदार सीजी ३३ किलो प्रति हेक्टरी प्रमाणे जमिनीत ओलावा असताना फेकीव पद्धतीने वापर करून दाणे जास्तीत जास्त पोंग्यामध्ये पडेल याची काळजी घ्यावी.

असे करावे व्यवस्थापन
जमिनीची खोल नांगरणी करावी, पतंगावर पाळत ठेवण्यासाठी प्रकाश सापळे व कामगंध सापळ्याचा पोंगे धारण अवस्थेत ठेवावे, प्रादुर्भावासाठी दोन वेळा सर्वेक्षण करावे, यासाठी शेतातील पाच ठिकाणचे मक्याचे २० झाड किंवा १० ठिकाणचे १० झाडे शेताचे प्रतिनिधीत्व करतील अशी निवडावीत, ट्रायकोग्रामा प्रजाती, टेलेनोमस रेमस या परोपजीवी कीटकांची एकरी ५० हजार अंडी याप्रमाणे शेतात सोडावे, त्यानंतर ४ ते ५ दिवसापर्यंत रासायनिक किटकनाशकाची फवारणी करू नये, अंडीपूंज व अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात, ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी, बॅसीलस थरिंजिएसीस २० ग्रॅम किंवा नोमुरिया रीलै किंवा मेटायझियम अनियोली ४० ग्रॅम १० लिटर पाणी याप्रमाणे जैविक किटकनाशकाची फवारणी करावी, केंद्रिय किटकनाशक बोर्डाने यावर्षीच्या हंगामाकरिता फॉल आर्मीवर्मच्या नियंत्रणाकरिता तात्पुरती शिफारस केलेली कीटकनाशके वापरावीत.

विशेष लक्ष देण्याची गरज का?
महाराष्ट्रात मका पिकावर ३५ टक्के सोबतच ज्वारीवर १० टक्के व उसावर ५ टक्क्यांपर्यंत प्रादुर्भावाची नोंद आहे. (चोरमुले, २०१९), बहुभक्षी किड (८० च्यावर वनस्पतीवर) उपजिविका करते. प्रसार होण्याचा खूप जास्त (पतंग अंडी देण्याअगोदर वेग ५०० किमीपर्यंत जाऊ शकतात. वाºयाचा वेग अनुकूल असल्यास ३० तासांत १६०० किमीपर्यंत गेल्याची नोंद आहे.) (रोजे आणि सहकारी १९७५), वर्षभर जीवनचक्र चालू राहते. (सोयाबीन, कापूस, भात सोबत एकूण ८० हून अधिक पिकेदेखील या किडीचे यजमान पिके असल्याने येणाºया काळात या किडीचा प्रादुर्भाव सर्वदूर दिसण्याची शक्यता आहे. अमेरीकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव ऊस पिकात दिसून आला. आजपावेतो या किडीचा प्रादुर्भाव फुटव्याच्या अवस्थेत असणाºयास ऊस पिकावर झाल्याचे निदर्शनास आले आहे.

Web Title: New military lane attack on maize, dangerous for Khiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.