नव्या शिलेदारांचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2017 12:13 AM2017-03-21T00:13:35+5:302017-03-21T00:13:35+5:30

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याची उत्कंठा मागील काही दिवसांपासून ताणली गेली आहे.

New Shillars Today Decision | नव्या शिलेदारांचा आज फैसला

नव्या शिलेदारांचा आज फैसला

Next

झेडपी निवडणूक : काँग्रेस व भाजपमध्ये थेट लढतीची शक्यता
अमरावती : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याची उत्कंठा मागील काही दिवसांपासून ताणली गेली आहे. उद्या यासंदर्भातील चर्चांना पूर्णविराम मिळणार असून मंगळवारी झेडपीचे नवीन शिलेदार जाहीर होतील. अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे नितीन गोंडाणे तर भाजपचे प्रताप अभ्यंकर यांच्यामध्ये थेट लढत होण्याचा अंदाज राजकीय जाणकार वर्तवित आहेत.
भाजपमध्ये अध्यक्षपदासाठी अनिल डबरासे, शरद मोहोड, आशा वानरे यांची नावे देखील स्पर्धेत आहेत. मात्र, नेमकी कोणाला उमेदवारी मिळते, हे निवडणुकी दरम्यान स्पष्ट होईल. काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी सध्या नितीन गोंडाणे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तर काँग्रेस, राकाँ, शिवसेनेकडून उपाध्यक्षपदासाठी दत्ता ढोमणे, गणेश सोळंके ही दोन नावे चर्चेत आहेत. उपाध्यक्षपदाच्या भाजपच्या उमेदवारांचे चित्र मात्र अस्पष्टच आहे.
स्थानिक जि.प.मध्ये सेना-भाजपसोबत नसल्याने येथील चित्र वेगळे आहे. येथे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्ष यांच्यात सत्तेसाठी घरोबा झाला आहे. भाजप १३, युवा स्वाभिमान २, प्रहार ५ व राष्ट्रवादी काँग्रेसचे ३, लढा १, बसप १ अशा एकू ण २५ सदस्य संख्येवर हा गाडा सध्या थांबला आहे. सत्तास्थापनेसाठी ३० ची ‘मॅजिक फिगर’ आवश्यक आहे. मात्र, त्यापेक्षा जास्त सदस्य काँग्रेस व मित्रपक्षांकडे आहेत. त्यामुळे भाजपने सत्तेसाठी कितीही आटापिटा केला तरी ते जादुई आकडा गाठू शकत नाहीत. भाजपने इतर सदस्यांना खेचून आणण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्यात. मात्र, फारसे यश आले नाही. सध्या तरी सत्तेचा चेंडू काँग्रेसच्या गोटात आहे. सध्या काँग्रेसचे २६, रिपाइं १, राकाँ २, शिवसेना ३ आणि अपक्ष २ अशा एकूण ३४ सदस्य एकत्रीतपणे सहलीवर असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे काँग्रेसची बाजू भक्कम दिसत आहे. भाजपचा आकडा पाहता त्यांना सत्तेसाठी पाच ते सहा सदस्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे उलथापालथीची शक्यता दिसत आहे.

Web Title: New Shillars Today Decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.