राज्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलींसाठी लवकरच नवी प्रणाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:10 AM2021-06-01T04:10:30+5:302021-06-01T04:10:30+5:30

सॉफ्टवेअर विकसित करणार, बदल्यांमधील राजकीय हस्तक्षेपांपासून गुरुजी हाेणार मुक्त अमरावती : राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्ह्या अंतर्गत ...

New system for transfer of Zilla Parishad teachers in the state soon | राज्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलींसाठी लवकरच नवी प्रणाली

राज्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलींसाठी लवकरच नवी प्रणाली

Next

सॉफ्टवेअर विकसित करणार, बदल्यांमधील राजकीय हस्तक्षेपांपासून गुरुजी हाेणार मुक्त

अमरावती : राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्ह्या अंतर्गत ऑनलाइन बदल्यांसाठी नव्याने सॉफ्टवेअर विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्यांमध्ये होणारा हस्तक्षेप थांबणार असून, नियमानुसार शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. त्यात सचिव तथा राज्य समन्वयक म्हणून सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची नेमणूक केली आहे. ही समिती पाच जणांची असून, अध्यक्ष आणि सचिव यांच्यासह तीन सदस्य चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार आणि वर्धा जिल्हा परिषदेचे सचिन ओंबासे हे सदस्य असणार आहेत.

राज्य शासनाच्या आदेशानुसार या संगणकीय प्रक्रियेसाठी लागणारे अंदाजपत्रक तयार करून राज्य शासनाकडे पाठवावे लागणार आहे. शिक्षकांचे आंतरजिल्हा आणि जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेसाठी निविदा प्रक्रिया राबविणे, त्यासाठी सातारा जिल्हा परिषद, महाआयटी, एनआयसी, सी-डॅक या संस्थांची मदत घ्यावी लागणार आहे. सॉफ्टवेअर विकसित केल्यानंतर त्याची चाचणी करून प्रत्यक्षात वापर करावा, असा सूचना देण्यात आल्या आहेत. सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आली आहे. त्यात शिक्षक बदलीमध्ये पारदर्शकता असावी आणि सुरक्षितता या दोन महत्त्वाच्या गोष्टीकडे सॉफ्टवेअर तयार करताना लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठी शॉर्ट टेंडर काढण्यात येणार असून, सर्व बाबींचा विचार करून ही समिती सदर सॉफ्टवेअर विकसित करेल. त्यानंतर तात्काळ शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला सुरुवात होईल, असे समितीचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Web Title: New system for transfer of Zilla Parishad teachers in the state soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.