नव्या कुलगुरूंनी घेतला परीक्षा विभागाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:15 AM2021-09-22T04:15:36+5:302021-09-22T04:15:36+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी मंगळवारी परीक्षा विभागात भेट देऊन येथील ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी मंगळवारी परीक्षा विभागात भेट देऊन येथील प्रगतिकार्याचा आढावा घेतला. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख यांनी परीक्षा विभागाने गेल्या पाच वर्षात केलेल्या प्रगतीचा अहवाल पी.पी.टी.द्वारे कुलगुरूंसमोर सादर केला. सादरीकरणामध्ये त्यांनी परीक्षा विभागातील कामकाजाची माहिती, पदवी प्रमाणपत्रे व इतर प्रमाणपत्रे, आचार्य पदवीसंबंधी प्रक्रिया, नामांकन, परीक्षा पद्धती, संशोधन, आय.सी.आर. याशिवाय निकाल प्रक्रिया, परीक्षा मंडळाचे कार्य असे एकूणच त्यांनी परीक्षाविषयक कामकाज जाणून घेतले.
यावेळी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एफ.सी. रघुवंशी, मुख्य मूल्यांकन अधिकारी डॉ. के.बी. देशमुख, परीक्षा विभागातील सहायक कुलसचिव (परीक्षा) मोनाली तोटे, सहायक कुलसचिव (सारणी) अनिल काळबांडे, सहायक कुलसचिव (परीक्षा) दीपक वानखडे, सहायक कुलसचिव (आचार्य पदवी व नामांकन) मीनल मालधुरे आदी उपस्थित होते.