खड्डे बुजविण्यासाठी न्यूझिलँड पॅटर्न

By admin | Published: June 7, 2014 12:32 AM2014-06-07T00:32:55+5:302014-06-07T00:32:55+5:30

दरवर्षी पावसाळय़ात रस्त्यांवरील खड्डय़ांची निर्माण होणारी समस्या लक्षात घेता

New Zealand pattern to crush the pits | खड्डे बुजविण्यासाठी न्यूझिलँड पॅटर्न

खड्डे बुजविण्यासाठी न्यूझिलँड पॅटर्न

Next

पावसाळय़ापूर्वीची तयारी : अत्याधुनिक जेट पॅचरचा वापर
अमरावती : दरवर्षी पावसाळय़ात रस्त्यांवरील खड्डय़ांची निर्माण होणारी समस्या लक्षात घेता महापालिका प्रशासनाने यंदा खड्डे बुजविण्यासाठी  न्यझिलँड पॅटर्न लागू केला आहे. त्याकरीता अत्याधुनिक जेट पॅचरचा वापर केला जात असून एका खड्डय़ाचे आयरुमान किमान दोन वर्षे राहिल, असे या  प्रणालीचे वैशिष्ठ आहे.
शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेच्या पाचही झोनमधून अशा रस्तांची यादी कनिष्ठ अभियंत्याच्या  माध्यमातून तयार करण्यात आली.
ज्या रस्त्यांवर जेट पॅचरने खड्डे बुजविले जात आहे. त्या रस्त्यांवर नव्याने डांबरीकरण किंवा दुरूस्तीचे काम होणार नाही,याची दक्षता घेण्याचे आदेश  आयुक्त अरूण डोंगरे यांनी दिले आहेत.
अत्याधुनिक जेट पॅचर या यंत्राव्दारे खड्डे बुजविण्याचे काम युध्दस्तरावर सुरू आहे. नवसारी, रहाटगाव, दस्तुरनगर व बडनेरा येथे खड्डे बुजविले जात  असल्याची माहिती शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम यांनी दिली. जेट पॅचर या यंत्राने एकाचवेळी रस्त्यावरील खड्डय़ाची सफाई, डांबरीकरण, गिट्टी व  रासायनिक द्रव्याचे मिश्रण करून पॅचेस केले जाते.
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी वापरली जात असलेली जेट पॅचर प्रणाली चांगली आहे. यापुर्वी खड्डे बुजविण्यासाठी लाखो रूपये खर्च झाले. मात्र  दर्जा काहीच मिळाला नाही, हे खरे आहे. दज्रेदार कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अरूण डोंगरे
आयुक्त, महापालिका

Web Title: New Zealand pattern to crush the pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.