हळद सुकण्यापूर्वीच नवविवाहित तरुणाचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:12 AM2021-04-26T04:12:32+5:302021-04-26T04:12:32+5:30
दर्यापूर: अवघ्या तीन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित तरुणाचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. गौरव अशोक इंगळे (रा. लाखपुरी) ...
दर्यापूर: अवघ्या तीन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित तरुणाचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. गौरव अशोक इंगळे (रा. लाखपुरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गौरवचे २२ एप्रिल रोजी दर्यापूर येथील रहिवासी भोरखडे यांच्या कुटुंबातील मुलीशी लग्न झाले होते.
लग्नविधी आटोपल्यानंतर नवविवाहित पत्नी दर्यापूर येथे आली होती. शनिवारी रात्री गौरव पत्नीला घरी नेण्यासाठी आपल्या एम.एच.३०-ए.एस.१३११ क्रमांकाचे दुचाकीने लाखपुरी येथून दर्यापूरकडे येत असताना गणेशपूर गावानजीक समोरून येणा-या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. अपघातात गंभीर मार लागल्याने गौरवचा घटनास्थळीच मृत्यू झाला. समोरून धडक देणा-या दुचाकीवरील एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.