बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:11 AM2021-07-25T04:11:38+5:302021-07-25T04:11:38+5:30

फोटो - अमित २४ ओ डांबरीकरणावरील खड्डे गिट्टी मुरुमाच्या साहाय्याने बुजविण्यास प्रारंभ इतर पुलावरील परिस्थिती ‘जैसे थे’, यंत्रणा लागली ...

News | बातमी

बातमी

Next

फोटो - अमित २४ ओ

डांबरीकरणावरील खड्डे गिट्टी मुरुमाच्या साहाय्याने बुजविण्यास प्रारंभ

इतर पुलावरील परिस्थिती ‘जैसे थे’, यंत्रणा लागली कामाला पण कुचराई कायम

(लोकमत इम्पॅक्ट)

अमित कांडलकर - गुरुकुंज(मोझरी) : आठ दिवसांपूर्वी नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरील खड्डे चक्क गिट्टी अन मुरुमाच्या साहाय्याने पावसाळ्यात दुरुस्त करण्याचा अनोखा प्रकार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमीपासून कर्मभूमीला जोडणाऱ्या १३ किलोमीटर रस्त्यावर पाहायला मिळतो. कमिशनखोरीमुळे कामात कुचराई करणारी प्रशासकीय यंत्रणा किती निर्ढावली असू शकते, याचा प्रत्यय या घटनाक्रमावरून येतो.

‘लोकमत’ने १३ किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणात प्रचंड सावळागोंधळ झाल्याचे वृत्त नुकतेच सचित्र प्रकाशित केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. दुसऱ्याच दिवशी संबंधित ठेकेदाराने रस्त्यावरील बातमीच्या अनुषंगाने दिलेल्या छायाचित्रातील स्थळ शोधून तितक्याच भागात स्वमर्जीने दुरुस्ती सुरू केली. प्रत्यक्षात दुरुस्तीच्या कामाची नियमावली असते. मात्र, पुलाच्या मुरमाड मातीवरील पसरविलेले तकलादू डांबरीकरण यंत्राच्या साहाय्याने जेमतेम ओरबाडून काढले. त्यावर परत गिट्टी आणि त्यावर पुन्हा मुरमाड माती पसरून रोड रोलरच्या मदतीने बुजवून सपाटीकरण करण्यात आले.

प्रत्यक्षात डांबरीकरण उखडलेल्या ठिकाणी दुप्पट लांबीची जागा तयार करून त्यात गिट्टी भरून पुन्हा डांबरीकरण करणे क्रमप्राप्त होते. पण, तसे कुठंच झाल्याचे दिसून येत नाही. या १३ किलोमीटर मार्गातील उर्वरित पुलावरीलही डांबरीकरण जागोजागी दबले अथवा उखडले आहे. त्याकडे अद्याप तरी जाणीवपूर्वक दुर्लक्ष संबंधित ठेकेदाराने चालविल्याचे एकूण कारभारावरून दिसून येते. शासकीय बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हितसंबंध बाजूला ठेवून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमीला कर्मभूमीशी जोडणाऱ्या रस्त्याची जातीने लक्ष घालून दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Web Title: News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.