बातमी / सारांश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:14 AM2021-02-11T04:14:43+5:302021-02-11T04:14:43+5:30
अमरावती : बडनेरा मार्गावरील नवाथे स्टॉप येथे क्रॉसिंगवर अपघातस्थळ झाले आहे. रेल्वे पूल ओलांडून येणारी वाहने ही थेट बडनेरा ...
अमरावती : बडनेरा मार्गावरील नवाथे स्टॉप येथे क्रॉसिंगवर अपघातस्थळ झाले आहे. रेल्वे पूल ओलांडून येणारी वाहने ही थेट बडनेरा मार्गावर येत असल्याने या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे. नियमानुसार वाहन चालकांनी क्रॉसिंगवर आल्यास अपघात होणार नाही, असे चित्र आहे.
---------------------------
बडनेरा रेल्वे स्थानकावर ऑटोंची गर्दी वाढली
अमरावती : ऑटो रिक्षांची गर्दी वाढत आहे. गत काही महिन्यांत सुनसान असलेल्या बडनेरा रेल्वे स्थानकावर हल्ली ऑगस्टपासून रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रवासीदेखील वाढले आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर आवागमन वाढीस लागले आहे. ऑटोरिक्षाही दिवसरात्र सुरू असल्याचे चित्र आहे.
---------------------------------
विद्यापीठात ‘नॅक’ मूल्यांकनाची तयारी
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात येत्या काही दिवसांमध्ये ‘नॅक’ मूल्यांकन होणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी चालविली आहे. झाडांना रंगरंगोटी, देखभालीचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. विद्यापीठाची हिरवी ओळख कायम ठेवण्यासाठी उद्यान विभागाने जोरदार तयारी सुरू केली आहे.
------------------------------------
रेल्वे स्टेशन चौकात वाहतूककोंडी
अमरावती : येथील रेल्वे स्टेशन चौकात सिमेंट रस्ते निर्मितीचे काम सुरू आहे. त्यामुळे बसस्थानकाकडे जाणारा मार्ग वनवे सुरू आहे. परिणामी, एकाच मार्गावरून वाहतूक सुरू असल्याने वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.
------------------
मोकाट कुत्र्यांचा हैदोस
अमरावती : महानगरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. रात्रीच्या वेळी वाहन चालकांच्या मागे मोकाट कुत्रे लागत असल्याने अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. कुत्र्यांची नसबंदी थांबली असून, मोकाट कुत्र्यांमध्ये बेसुमार वाढ झाली आहे.