बातामी/ सारांक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:11 AM2021-01-04T04:11:04+5:302021-01-04T04:11:04+5:30
अमरावती : येथील वनविभागाच्या बांबू गार्डन मार्गालगत अतिक्रमणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. काही अतिक्रमण हे वनविभागाच्या जागेत सर्रासपणे ...
अमरावती : येथील वनविभागाच्या बांबू गार्डन मार्गालगत अतिक्रमणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. काही अतिक्रमण हे वनविभागाच्या जागेत सर्रासपणे करण्यात आले आहे. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे पर्यटकांना त्रास होत आहे.
--------------------------
बिच्छू टेकडी भागात वीटभट्ट्यांचे अतिक्रमण
अमरावती : येथील बिच्छू टेकडी भागात वीटभट्ट्यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहे. यात काही अतिक्रमण हे वन, महसूल विभागाच्या जागेवर आहे. न्यायालयीन प्रकरणांच्या नावे वर्षांनुवर्षे वीटभट्ट्यांचे अतिक्रमण कायम आहे.
----------------------
नवीन बायपास वडाळी वळण मार्ग उखडला
अमरावती : नागपूर महामार्ग नवीन बायपासवरून वडाळीकडे जाणारा वळण मार्ग उखडला आहे. या मार्गावरून नियमित वाहतूक सुरू असताना वळण मार्गाची दुरुस्ती करण्यात येत नाही. दुचाकी, चारचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ राहते.
-----------------------------
कोंडेश्वर मार्गावर ई- क्लास जमिनींवर खोदकाम
अमरावती : बडनेरा ते कोंडेश्वर मार्गावर ई-क्लास जमिनीवर जागोजागी खोदकाम करण्यात आले आहे. या खोदकामांमुळे मोठमोठे खड्डे पडले असून, हे खड्डे भविष्यात जीवघेणे ठरणारे आहे. अवैधरीत्या खोदकाम करून खनीज संपत्ती चोरीला जात असताना तलाठी कोणतीही कारवाई करीत नाही.
--------------------------------
ऑक्सिजन पार्कमध्ये हिरवळ बहरली
अमरावती : येथील जुने बायपासलगतच्या ऑक्सिजन पार्कमध्ये हिरवळ बहरली आहे. विविध प्रजातींचे वृक्ष, फुलझाडांनी हा परिसर खुलला आहे. ऑक्सिजन पार्क नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी आहे. तत्कालीन सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांच्या प्रयत्नातून शासन निधीतून हे पार्क साकारण्यात आले आहे.