बातमी / सारांश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:12 AM2021-01-21T04:12:52+5:302021-01-21T04:12:52+5:30
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृह मार्गावरील रस्त्याची चाळण झाली असताना हा मार्ग दुरूस्त का करीत नाही, असा सवाल उपस्थित ...
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृह मार्गावरील रस्त्याची चाळण झाली असताना हा मार्ग दुरूस्त का करीत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. याच मार्गावर समाजकल्याणचे वसतिगृह, सिंचन अभियंता कार्यालय असून, सतत वर्दळीचा मार्ग असतानासुद्धा खड्डे बुजविण्यास टाळाटाळ केली जात आहे.
----------------------
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, शिक्षण संचालनालय उच्च शिक्षण विभाग याच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा पार पडला. सांगली येथील बलवंत जेऊरकर यांनी मार्गदर्शन केले. व्हच्युर्अलसी फोर अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला.
--------------------------
बियाणी चौकात अतिक्रमण
अमरावती : येथील विद्यापीठ मार्गावरील बियाणी चौकात हातगाडी, पानठेले, चहा विक्रेत्यांच्या गाड्यांनी रस्त्यालगत अतिक्रमण केले आहे. लगतच बँक असल्याने हा परिसर सतत वर्दळीचा असतो. मात्र, रस्त्यालगत हातगाड्या, घाऊक विक्रेत्यांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.
---------------------------
सिद्धार्थनगरात साफसफाई दुर्लक्ष
अमरावती : स्थानिक रामपुरी कॅम्पलगतच्या सिद्धार्थनगरात नाला, साफसफाईकडे दुर्लक्ष करण्यात
येत आहे. नाल्या तुंबल्याने या भागात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात नियमित साफसफाई
करण्यात येत नाही, अशी नागरिकांची ओरड आहे.
-------------------------
जयहिंद चौकात रस्त्यालगत अतिक्रमण
अमरावती : बडनेरा नवीन वस्तीच्या जयहिंद चाैकात रस्त्यालगत अतिक्रमण झाले आहे. हातगाडी, पानठेले, तात्पुरत्या स्वरूपातील दुकाने थाटली आहेत. या दुकानांमुळे रस्ता अडविण्यात आला आहे. यामुळे पादचाऱ्यांना ये-जा करणे कठीण झाले आहे.