वृत्तपत्र सुरक्षित, कोरोनाचा प्रसार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:13 AM2021-04-25T04:13:14+5:302021-04-25T04:13:14+5:30
अमरावती : कोरोनाचा संसर्ग वाढता असणाऱ्या काळात वृत्तपत्राद्वारे अचूक व उपयुक्त माहिती दिली जात आहे. कोरोना काळातही वृत्तपत्र सुरक्षित ...
अमरावती : कोरोनाचा संसर्ग वाढता असणाऱ्या काळात वृत्तपत्राद्वारे अचूक व उपयुक्त माहिती दिली जात आहे. कोरोना काळातही वृत्तपत्र सुरक्षित असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल, ०००००००००० यांनी दिली.
सुरक्षित आणि उपयुक्तता हे वर्तमानपत्राचे अंग आहे. जागतिक आरोग्य संघटनेद्वारा (डब्लूएचओ) वृत्तपत्र सुरक्षित असल्याचे यापूर्वीच शिक्कामोर्तब केलेले आहे. प्रत्येक टप्प्यावर कोविड-१९ नियमावलीचे पालन करूनच वृत्तपत्र तुमच्या घरापर्यंत पोहोचत आहे. वृत्तपत्र हाताळल्यामुळे संसर्ग होतो, हा केवळ गैरसमज आहे. वृत्तपत्र वाचल्याने कोरोनाचा कुठलाही धोका नाही. वृत्तपत्रांतून कोरोना काळात जनजागृती सोबतच सुरक्षिततेसाठीची माहिती प्रसारणाचे काम उत्तमरीत्या होत आहे.
जगात, देशात अन् आपल्या गावांत, शहरात काय घडामोडी होत आहेत, त्यासंर्दभात पारखून घेतलेली माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे वृत्तपत्र हे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे वृत्तपत्र नियमित आणि बिनधास्तपणे वाचले पाहिजे, असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले आहे.
बॉक्स
वृत्तपत्र हे समाजमनाचा आरसा आहे.
वृत्तपत्र हे समाजमनाचा कानोसा घेणारे एक प्रभावी माध्यम आहे. समाज माध्यमांतून अफवांचा बाजार मांडला जात असताना वृत्तपत्रांची विश्वासार्हता घट्टपणे रुजलेली आहे. ‘लोकमत’चे आणि विश्वासार्हतेचे नाते अतूट आहे. कोरोना काळातही ‘लोकमत’च्या माध्यमातून वास्तव आपल्यापर्यंत पोहचविले जात आहे.
कोट
वृत्तपत्र वाचल्याने कोरोना होत नाही. वितरकांमार्फत त्रिसूत्रीचे पालन करूनच वृत्तपत्र वितरण करावे.
- शैलेश नवाल,
जिल्हाधिकारी
कोट
००००
००००००००