दुसऱ्या दिवशीही वादळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 01:46 AM2019-06-07T01:46:12+5:302019-06-07T01:46:53+5:30
परतवाडा -अचलपूरसह परिसरात दुसऱ्या दिवशीही गुरुवारी वादळी पावसाने हजेरी लावली. यात विजाही कडाडल्या. सायंकाळी साडेपाच ते साडे सहा वाजताच्या दरम्यान या पावसाच्या सरी कोसळ्यात काल बुधवारला ही याच वेळेत परतवाड्यात पावसाने हजेरी लावली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : परतवाडा -अचलपूरसह परिसरात दुसऱ्या दिवशीही गुरुवारी वादळी पावसाने हजेरी लावली. यात विजाही कडाडल्या. सायंकाळी साडेपाच ते साडे सहा वाजताच्या दरम्यान या पावसाच्या सरी कोसळ्यात काल बुधवारला ही याच वेळेत परतवाड्यात पावसाने हजेरी लावली होती.
गुरुवार आठवडी बाजाराचा दिवस. आठवडी बाजाराला मेळघाटसह ग्रामीण भागातील लोकांचीही परतवाड्यात चांगलीच वर्दळ असते. या वर्दळीतच वादळी पावसाने हजेरी लावल्यामुळे बाजारातील दुकानदारांची आणि लोकांची एकच तारांबळ उडाली. तर कृषिउत्पन्न बाजार समितीत विक्रीस आणलेले हजारो पोते उघड्यावर राहिल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत ओले झाले. वादळामुळे अमरावती व अंजनगाव, अकोला मार्गावर झाड उन्मळून पडलेत. काही ठिकाणी फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीलाही मोठा फटका बसला.
शेतकºयांच्या मालाकरिता टीन शेड उभारले आहेत. पण टिनशेडमध्ये आणि आॅक्शन हॉलमध्ये व्यापाºयांचे धान्य अडत्यांनी भरून ठेवले आहेत. शेतकऱ्यांचा माल ते उघड्यावर ठेवतात. व्यापाºयांनी आपला वेअर हाऊसमध्ये ठेवायला हवे होते. पण तेथे भाडे मोजावे लागत असल्याने व्यापाºयांचा माल टिन शेडमध्ये व आॅक्शन हॉल शेतकºयांसाठी राखीव असताना अडत्यांनी तेथे ठेवला आहे. यात शेतकºयांचा माल ओला झाला आहे. यात लाखो रुपयांच्या मालाची नासाडी झाली आहे.
याकडे डीडीआर आणि डीएमओंनी लक्ष घाण्याची गरज निर्माण झाली असून, हे अधिकारी नेमकी कोणती पावले उचलतात याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे.
नवनीत राणांच्या आभार रॅलीलाही फटका : खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मतदारांचे आभार माणण्याकरिता खासदार नवनीत राणा यांची आभार रॅली परतवाडा-अचलपूर मध्ये सायंकाळी ४ वाजता आयोजित होती. पण त्या पोहचू न शकल्यामुळे सात वाजेपर्यंत ही या आभार रॅलीला सुरुवात झालेली नव्हती.
भूगाव जवळ झाडे कोसळली : परतवाडा - अमरावती रस्त्यावरील भूगाव मेघनाथपूर दरम्यान मोठमोठी झाडे उन्मळून कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या रस्त्याने धावणाºया एका शिवशाही बसवर झाडाच्या फांद्या कोसळल्या. मोठा अपघात टळला. गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आलेल्या वादळी पावसामुळे ही घटना घडली.
ओले झालेले पोते व्यापाऱ्यांचे आहेत. शेतकºयांचे नाहीत. कुठल्याही शेतकºयांची तक्रार आमच्याकडे नाही.
- पी.बी. सारवे, सचिव,
कृषी उत्पन्न बाजार समिती, अचलपूर