विजेचा शॉक देऊन निकिताची हत्या

By admin | Published: February 28, 2016 11:59 PM2016-02-28T23:59:27+5:302016-02-28T23:59:27+5:30

काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या निकिता सवई मृत्यू प्रकरणाचे गूढ बाहेर आले आहे.

Nikita's murder by electric shock | विजेचा शॉक देऊन निकिताची हत्या

विजेचा शॉक देऊन निकिताची हत्या

Next

आरोपी रोहित वानखडेला अटक : आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
अमरावती : काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या निकिता सवई मृत्यू प्रकरणाचे गूढ बाहेर आले आहे. प्रेमसंबंधात झालेल्या वादामुळे निकिताला विजेचा शॉक देऊन तिची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. रविवारी निकिता हिची आई ज्योती अरुण सवई (४२, रा, लोणी टाकळी) यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी रोहित वानखडेविरुध्द हत्येचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
फरशी स्टॉप परिसरातील रहिवासी मधुकर ढोले यांच्या घरात निकिता भाड्याने खोली घेऊन राहात होती. २२ फेब्रुवारी रोजी तिचा खोलीतच संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन अहवालातून निकिताचा मृत्यू विद्युत प्रवाहाच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले. निकिताच्या चुकीने विजेचा शॉक लागला की, हत्येच्या उद्देशाने तिला विजेचा शॉक लावण्यात आला, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू झाला. प्रकरणाचा तपासात संभ्रम निर्माण झाल्यामुळे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी स्वत: घटनास्थळी भेट देऊन निकिताच्या खोलीची पाहणी केली. पोलीस अधिकाऱ्यांना योग्य निर्देश देऊन तपासकार्य लवकरच पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी तपासातील विविध बाजू पडताळून पाहिल्या. निकिताच्या संपर्कात असणाऱ्यांची बयाणे नोंदविली. तिचे कॉल डिटेलवरून तिच्याशी धनिष्ट संबंध असणाऱ्यांची चौकशी केली. यामध्ये पोलिसांनी रोहित वानखडे या युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानेही निकिताशी संबंध असल्याचे व मृत्यूपूर्वी तो तिच्या घरी गेल्याची कबुली दिली. मात्र, अद्यापपर्यंत रोहितने गुन्ह्याची कबुली दिली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. शनिवारी निकिताची आई ज्योती अरुण सवई यांनी रोहितविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

निकिताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुध्द हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील चौकशी सुरु आहे.
- एस.एस.भगत,
पोलीस निरीक्षक.

Web Title: Nikita's murder by electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.