विहिरीत पडलेल्या नीलगायीला बाहेर काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:14 AM2021-05-14T04:14:01+5:302021-05-14T04:14:01+5:30
नांदगाव खंडेश्वर: तालुक्यातील सालोड येथील श्रीधर इंझळकर यांच्या शेतातील सुमारे ४० फूट खोल विहिरीत पडलेल्या निल गाईला वनविभागाच्या चमूने ...
नांदगाव खंडेश्वर: तालुक्यातील सालोड येथील श्रीधर इंझळकर यांच्या शेतातील सुमारे ४० फूट खोल विहिरीत पडलेल्या निल गाईला वनविभागाच्या चमूने सुखरूप बाहेर काढले. रखरखत्या उन्हात पाण्याच्या शोधात वन्य प्राण्याची भटकंती सुरू आहे.
बुधवारी रात्री सालोड येथील शेतातील विहिरीत दोन नीलगाई पडल्या. ही घटना गावकऱ्यांना माहीत होताच त्यांनी वनविभागाला कळवली. गुरूवारी वन विभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. त्यांना विहिरीत एक गाय मृतावस्थेत व एक नीलगाय पाण्यावर तरंगताना आढळली. त्या विहिरीतील जिवंत नीलगाईला वनविभागाचे वनपाल सुरेश मनगटे, वनरक्षक अमोल गावनेर, मनोज माहुलकर, सुधीर काळपांडे सतीश उमक मनोज ठाकूर वैभव राऊत आसिफ पठाण यांच्या चमूने गावातील युवकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढून तिला वाचविले व जंगलात सुखरूप सोडले.