नऊ कंत्राटी आरोग्य निरीक्षक बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 10:28 PM2018-08-29T22:28:14+5:302018-08-29T22:28:36+5:30

कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरुन शहरातील विविध प्रभागांत कार्यरत नऊ कंत्राटी आरोग्य निरीक्षकांना बडतर्फ करण्याची कारवाई महापालिकेने केली. ‘लोकमत’ने डेंग्युच्या प्रकोपाचा मुद्दा उचलून धरल्यावर महापालिकेने ही कारवाई केली, हे येथे उल्लेखनीय! निरीक्षकांवर कारवाई करण्यात आली असली तरी वरीष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईची तलवार उगारणार तरी केव्हा हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे.

Nine contract health inspector Badtarf | नऊ कंत्राटी आरोग्य निरीक्षक बडतर्फ

नऊ कंत्राटी आरोग्य निरीक्षक बडतर्फ

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिकेची कारवाई : डेंग्यूसंबंधीची दिरंगाई भोवली, 'लोकमत'च्या वृत्तमालेनंतर हलले प्रशासन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरुन शहरातील विविध प्रभागांत कार्यरत नऊ कंत्राटी आरोग्य निरीक्षकांना बडतर्फ करण्याची कारवाई महापालिकेने केली. ‘लोकमत’ने डेंग्युच्या प्रकोपाचा मुद्दा उचलून धरल्यावर महापालिकेने ही कारवाई केली, हे येथे उल्लेखनीय! निरीक्षकांवर कारवाई करण्यात आली असली तरी वरीष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईची तलवार उगारणार तरी केव्हा हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे.
बडतर्फ करण्यात आलेल्यांमध्ये प्रभाग ३ नवसारीचे आरोग्य निरीक्षक एन.बी.पाठक, बेनोडा प्रभाग १०चे सचिन हगवणे, संकेत सावंत, साईनगर प्रभाग १९चे गणेश मडावी, जोग स्टेडियम प्रभाग ८ चे ए.जी.आकोडे, फ्रेजरपुरा ११चे सागर शेगोकार, राजापेठ प्रभाग १८ चे ओ.एच. कोेल्हे, जमील कॉलनी प्रभाग ४ चे के.ए. बावणकर, एसआरपीएफ प्रभाग १४ चे अश्विनी बमनोटे यांचा समावेष आहे. या निरीक्षकांना महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील साफसफाई कामांवर नियंत्रण ठेवण्याकरिता बाह्य यंत्रणांद्वारे नेमणूक देण्यात आली होती.
'लोकमत'ची दखल घेऊन नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी शहरात झपाट्याने पसरत असलेल्या डेंग्यूसंदर्भात बैठक बोलविली होती. महापालिका आयुक्तांना त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते.
शहरात डेंग्यूची साथ पसरली असतानाही अस्वच्छता कायम आहे. नागरिक भयभीत आहेत. आरोग्य विभाग स्वच्छतेबाबत दिरंगाई करीत असल्याने साथीचे आजार पुन्हा पसरण्याचा धोका आहे. यामुळे या विषयात मोठी कारवाई अपेक्षित असताना, फक्त कंत्राटी निरीक्षकांना कामावरून कमी करण्यात आले आहे. शहरभरातील आठ लक्ष लोकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ अधिकाºयांवर मात्र कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. शहरतील जाणकारांमध्ये त्यामुळे करण्यात आलेली कारवाई अपूर्ण असल्याचा सूर उमटला होता.

डेंग्यू हा अमरावतीकरांसाठी जीवन-मरणाचा प्रश्न ठरला आहे. स्वच्छतेच्या कामात दिरंगाई केल्यामुळे आयुक्तांच्या आदेशाने नऊ कंत्राटी आरोग्य निरीक्षकांना बडतर्फ करण्यात आले आहे.
- नरेंद्र वानखडे, उपआयुक्त ( सामान्य)

Web Title: Nine contract health inspector Badtarf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.