नऊ फुटांचा अजगर, पंधरा अंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:01 PM2018-06-27T22:01:09+5:302018-06-27T22:01:25+5:30

नऊ फुटांचा अजगर आणि तिने घातलेली १५ अंडी बुधवारी दर्यापूर येथे बसस्थानकामागील कब्रस्तान परिसरात आढळून आल्याने खळबळ उडाली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेऊन अजगरासह अंडी सुरक्षित बाहेर काढली.

Nine ft dragon, fifteen eggs | नऊ फुटांचा अजगर, पंधरा अंडी

नऊ फुटांचा अजगर, पंधरा अंडी

Next
ठळक मुद्देवनविभागाला पाचारण : वसा संस्था करणार देखभाल

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नऊ फुटांचा अजगर आणि तिने घातलेली १५ अंडी बुधवारी दर्यापूर येथे बसस्थानकामागील कब्रस्तान परिसरात आढळून आल्याने खळबळ उडाली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेऊन अजगरासह अंडी सुरक्षित बाहेर काढली.
अजगराला रामतीर्थ जंगलात सोडण्यात आले असून, त्या अंड्यांची देखभाल वसा संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. कब्रस्तानमागील परिसरात कुंपणासाठी खोदकाम सुरू असताना अचानक मजुरांना अजगर व अंडी दिसली. त्यामुळे मजूर घाबरले. ही माहिती स्थानिक सर्पमित्र राज वानखडे यांना मिळाली. त्यांनी शहानिशा करून अमरावती येथील वसा संस्थेचे सर्पमित्र शुभम सायंके यांना माहिती दिली. सायंके यांनी उपवनसरंक्षक हेमंत मिणा यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी अमरावती वनविभागाच्या रेस्क्यू पथकातील सतीश उमक, वीरेंद्र उज्जैनकर, मनोज ठाकूर, चंद्रकांत मानकर, फिरोज खान व पवार यांना दिमतीला दिले. त्यांच्यासह शुभम सायंके यांनी दर्यापूर गाठले. या चमूने अजगर व अंड्यांना सुखरूप बाहेर काढले. यानंतर त्यांची पशुवैद्यकीय चिकित्सकाजवळ तपासणी करण्यात आली. वनविभागाने अजगराला जंगलात सोडले, तर पंधरा अंडी देखभालासाठी वसा संस्थेच्या शुभम सांयकेच्या स्वाधीन करण्यात आली. आता २५ दिवसांनंतर अंड्यातून अजगराची पिल्ले बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, तोपर्यंत वसा संस्था अंड्याची देखभाल करणार आहेत.

Web Title: Nine ft dragon, fifteen eggs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.