काय पण शक्कल! अंगाला गुंडाळला नऊ किलो गांजा

By प्रदीप भाकरे | Published: November 8, 2024 01:25 PM2024-11-08T13:25:55+5:302024-11-08T19:05:42+5:30

दोघांना अटक : क्राईम युनिट दोनची पंचवटी चौकात कारवाई

Nine kilos of ganja wrapped around his body | काय पण शक्कल! अंगाला गुंडाळला नऊ किलो गांजा

Nine kilos of ganja wrapped around his body

प्रदीप भाकरे 

अमरावती : गांजा वा गुटखा तस्करीसाठी तस्कर काय करतिल, याचा काही नेम नाही. असाच एक अफलातून प्रकार येथील पंचवटी चौकात उघड झाला. शहर गुन्हे शाखेच्या क्राईम युनिट दोनच्या पथकाने दोन तस्करांची झाडाझडती घेतली असता, त्यांच्या कपड्यांआड अंगाला कपड्यांत गुंडाळलेला ९ किलो ७३५ ग्रॅम गांजा आढळून आला. ७ नोव्हेंबर रोजी रात्री स्थानिक पंचवटी चौकात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. सादिक शहा बिसमिल्ला शहा (४०, लालखडी, इमाम नगर, अमरावती) व शेख महबुब शेख रूस्तम (६०, रा.इतवारी बाजार, वर्धा) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
             

गुन्हेशाखा युनिट दोनचे पथक आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पंचवटी चौक येथे दोन इसम हे गांजाची तस्करी करून त्याची विकी करण्याचे उद्देशाने येत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्या आधारे, पंचवटी चौकात ट्रॅप रचण्यात आला. त्यावेळी वेलकम टि पाॅंईटकडून पंचवटी चौकात येत असलेल्या दोन संशयित इसमांना विचारणा करण्यात आली. त्यांची अंगझडती घेतली असता आरोपींच्या अंगात (कपड्यांच्या आत) पांढ-या रंगाच्या कापडामध्ये गांजा आढळून आला. आरोपींकडे आढळलेला १ लाख ८८ हजार २०० रुपये किमतीचा ९.७३५ किलो ग्रॅम गांजा व १२ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकुण २ लाख २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींविरूध्द गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाईपोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, उपायुक्तत्रयी कल्पना बारवकर, गणेश शिंदे व सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजीराव बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट दोनचे प्रमुख तथा पोलिस निरिक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरिक्षक योगेश इंगळे, उपनिरिक्षक संजय वानखडे, अंमलदार अजय मिश्रा, दिपक सुंदरकर, निखील माहोरे, चेतन कराडे, राजीक रायलीवाले, योगेश पवार, सागर ठाकरे, राहुल दुधे यांनी ही कारवाई केली.

Web Title: Nine kilos of ganja wrapped around his body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.