वडाळी, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात १० वर्षांत नऊ बिबटांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 01:11 AM2017-10-22T01:11:00+5:302017-10-22T01:11:11+5:30

वडाळी व चांदूर रेल्वे या दोन्ही वनपरिक्षेत्रात दहा वर्षांमध्ये नऊ बिबटांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. दरम्यान, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात बिबटाच्या दोन पिलांच्या जन्माची नोंद घेण्यात आली आहे.....

Nine leopards die in 10 years in Vadali, Chandur railway forest | वडाळी, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात १० वर्षांत नऊ बिबटांचा मृत्यू

वडाळी, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात १० वर्षांत नऊ बिबटांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देदोन बछड्यांचा स्वच्छंद विहार : वन्यप्राणी वाढले, राज्य महामार्गावर अपघाताची शक्यता, वनविभाग सतर्क

लोकमत न्यूज नेटवर्क
पोहरा : वडाळी व चांदूर रेल्वे या दोन्ही वनपरिक्षेत्रात दहा वर्षांमध्ये नऊ बिबटांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. दरम्यान, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात बिबटाच्या दोन पिलांच्या जन्माची नोंद घेण्यात आली आहे तसेच वन्यप्राण्यांची संख्यादेखील वाढली आहे.
वडाळी वनपरिक्षेत्रात पोहरा, भानखेडा, इंदला, पिंपळखुटा, बोडणा, परसोडा, घातखेडा, कस्तुरा, मोगरा, तर चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात चिरोडी, कुºहा, मार्डी, पाथरगाव, माळेगाव, कारला बिटचा समावेश होतो. पाथरगावच्या एका विहिरीमध्ये पडून बिबट्याचा मृत्यू झाला, तर सासू-सुनेच्या वाडीत लावलेल्या फासात एक बिबट अडकून मरण पावला होता. मार्डी वनक्षेत्रात लागलेल्या वणव्यात तसेच तिवसा वनक्षेत्रात व शेंदूरजना खुर्द येथील एका शेतात बिबट्याचा मृत्यू झाला होता. अशाप्रकारे चांदूर वनपरिक्षेत्रात पाच बिबट्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे वडाळी वनपरिक्षेत्रातील हाय-वेवर, भवानी तलाव परिसरात, वैष्णोदेवी मंदिराजवळ तसेच मागील वर्षी एका बिबटाचा मृत्यू झाला.
दरम्यान, वडाळी वनपरिक्षेत्रात बिबट्याच्या दोन पिलांच्या जन्माची नोंद करण्यात आली आहे. चांदूर रेल्वे ते अमरावती मार्गावर वाहतूक वाढली आहे. या मार्गावर वनविभागाने सूचना फलक लावले आहेत. मात्र, ते पुरेसे नाहीत. वनपरिक्षेत्रात सर्वाधिक वावर बिबट्यांचा आहे. त्यांची संख्या वाढल्याने वनविभाग सतर्क झाला आहे.
समृद्ध वन्यजीवन
अमरावती शहरानजीकच्या पाचशे क्वार्टरपासून राखीव वनक्षेत्र सुरू होते. ते चांदूर रेल्वेपर्यंत पसरले आहे. दोन्ही वनपरिक्षेत्रांमध्ये वाघ, बिबट, हरीण, नीलगाय, सांबर, रानडुक्कर, मोर, लांडगे, तडस, चितळ आदी वन्यप्राण्यांची नोंद झाली आहे.
गतिरोधकाची आवश्यकता
चांदूर रेल्वे ते अमरावती मार्गावर दोन बिबटांना अपघातात प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे भानखेडा, बोडणा फाटा, वाघाईमाता मंदिर, पोहरानजीक हनुमान मंदिर या ठिकाणी गतिरोधक वनविभागाने प्रस्तावित केले आहेत.

Web Title: Nine leopards die in 10 years in Vadali, Chandur railway forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.