अमरावतीचे नऊ जण अयोध्येसाठी सायकलने रवाना, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार

By गणेश वासनिक | Published: January 9, 2024 12:52 PM2024-01-09T12:52:53+5:302024-01-09T12:53:10+5:30

एक हजार किमी लांबीची सायकल यात्रा

Nine people from Amravati will leave for Ayodhya by cycle and participate in the Pranpratistha ceremony | अमरावतीचे नऊ जण अयोध्येसाठी सायकलने रवाना, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार

अमरावतीचे नऊ जण अयोध्येसाठी सायकलने रवाना, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार

अमरावती : अयाेध्या येथे २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या भव्यदिव्य साेहळ्यात 
सहभागी होण्यासाठी अमरावती येथील नऊ रामभक्त मंगळवारी १० वाजता सायकलने अयोध्येकडे रवाना झाले आहेत. यावेळी कालीमाता मंदिर ट्रस्टचे शक्ती महाराज, माजी राज्यमंत्री जगदिश गुप्ता यांच्या हस्ते झेंडा दाखवून सायकलस्वार रामभक्तांना रवाना 
करण्यात आले. 

या सायकलस्वार रामक्तांचे नेतृत्व मेजर राजेंद्र सिंह हे करीत आहे. तर दीपक दुबे, समीर मानेकर, सुरज ठाकूर, दीपक पाली, ऋतिक 
पाली, राजा चौधरी, शिवकांत बद्रे अण्णा, नरेश अण्णा हे यात सहभागी झाले आहेत. या रामभक्तांनी अयाेध्येकडे रवाना हाेण्यापूर्वी अमरावती शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केले, त्यानंतर नांदगापेव पेठ होत माहुली जहाँगीर पुढे मोर्शी मार्गे मध्यप्रदेशकडे रवाना झालेत.

Web Title: Nine people from Amravati will leave for Ayodhya by cycle and participate in the Pranpratistha ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.