वरुड तालुक्यात नऊ प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’

By Admin | Published: September 1, 2015 12:07 AM2015-09-01T00:07:46+5:302015-09-01T00:07:46+5:30

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारुपास आलेल्या वरुड तालुक्यात यावर्षी अति पर्जन्यमान झाले आहे.

Nine projects 'overflow' in Varud taluka | वरुड तालुक्यात नऊ प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’

वरुड तालुक्यात नऊ प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’

googlenewsNext

७२७.२० मि.मी. पावसाची नोंद : गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट पर्जन्यमान
वरुड : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारुपास आलेल्या वरुड तालुक्यात यावर्षी अति पर्जन्यमान झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट पर्जन्यमान झाले असून २७ आॅगस्टला ७२७.२० मिमी पावसाची नोंद आहे. गतवर्षी ही नोंद ५७०.४९ मि.मी. एवढीच होती. पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. तालुक्यातील १० जलप्रकल्पांपैकी ९ प्रकल्प १०० टक्के भरल्याने ओसंडून वाहत आहे.
तालुक्यातील पीक परिस्थिती पाहता समाधानकारक आहे. रोगांचा प्रादुर्भाव आणि तण वाढल्याने तणनाशकाचा वापर केला जात आहे. वरुड तालुक्यात १० मध्यम आणि लघु प्रकल्प आहेत. यामध्ये शेकदरी, पंढरी, वाई, नागठाणा-१, नागठाणा-२, सातनूर, जामगाव, जमालपूर, पुसली, लोणी धवलगिरी हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.
बेलसावंगी प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्याने जलसंचय होऊ शकत नाही. तरी मात्र यामध्येसुध्दा ६० टक्के तूर्तास जनसंचय आहे. नऊ प्रकल्प पूर्णपणे भरले असून ओसंडून वाहत आहेत. २७ आॅगस्ट रोजी २०१५ पर्यंत ७२७.२० मिमी पावसाची नोंंद झाली आहे.
गतवर्षी २०१४ मध्ये २७ आॅगस्टला ही नोंद ५७०.४९ मि.मी. होती. गतवर्षीच्या तुलनेत ही नोंद १५६.७१ मिमी जास्त आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Nine projects 'overflow' in Varud taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.