नऊ वर्षांनंतर मनोरुग्ण सुखरूप घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 11:04 PM2019-01-12T23:04:10+5:302019-01-12T23:04:32+5:30
नऊ वर्षांपूर्वी बहिणीच्या घरून निघून गेलेला मनोरुग्ण केरळ येथील सामाजिक संस्थेच्या मदतीने घरी सुखरूप परतला. त्याच्या परतण्याने आर्वी तालुक्यातील परतोडा येथील त्यांच्या कुटुंबीयांसह तिवसा येथील त्यांच्या बहिणीच्या कुटुबांच्या आनंदास पारावर राहिला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : नऊ वर्षांपूर्वी बहिणीच्या घरून निघून गेलेला मनोरुग्ण केरळ येथील सामाजिक संस्थेच्या मदतीने घरी सुखरूप परतला. त्याच्या परतण्याने आर्वी तालुक्यातील परतोडा येथील त्यांच्या कुटुंबीयांसह तिवसा येथील त्यांच्या बहिणीच्या कुटुबांच्या आनंदास पारावर राहिला नाही.
धर्मपाल सुखदेवराव तिखाडे (५२, रा. परतोडा) हे मनोरुग्ण तिवसा येथील संगीता दहाट या त्यांच्या बहिणीच्या घरून नऊ वर्षे आधी निघून गेला होते . ते जीवित आहे की कसे, या विवंचनेत कुटुंब होते. गुरुवारची सकाळ त्यांच्या परिवाराला आनंद देणारी ठरली. केरळ येथील दिव्य गारूना या सामाजिक संस्थेने धर्मपाल यांचा मुलगा रूपेशकडून ते त्याचेच वडील असल्याची खातरजमा केली. ते सुखरूप आहेत. तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्यांना घेऊन येत आहोत, असे म्हणत व्हॉट्सअप वरून व्हिडीओ कॉल केला. शुक्रवारी धर्मपाल तिखाडे यांना त्यांचे घरी गावी परतोडाला सुखरूप घेऊन आले. त्यांचे पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण, भाचे व लोकांना विश्वासच बसत नव्हता. तथापि, ते सुखरूप दिसल्यानंतर कुटुंबातील सदस्य व बहिणीला आनंद मावेनासा झाला. सामाजिक संस्थेच्या एलिसा बर्थ व अजित तोमस यांनी बांधीलकी जपली.