बडनेऱ्यात हनुमान भक्ताने ओढल्या नऊ बंड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 10:25 PM2018-03-31T22:25:48+5:302018-03-31T22:25:48+5:30

जुन्या वस्तीतील बारीपुरास्थित हनुमान मंदिरात ६५ वर्षांपासून बंड्या ओढण्याची परंपरा जोपासली जात आहे. यंदाही एकट्या हनुमान भक्ताने नऊ बंड्या ओढल्याचे तेथील उपस्थित शेकडो भाविकांनी अनुभवले.

Nineteen vandalized by Hanuman devotees in Badnera | बडनेऱ्यात हनुमान भक्ताने ओढल्या नऊ बंड्या

बडनेऱ्यात हनुमान भक्ताने ओढल्या नऊ बंड्या

googlenewsNext
ठळक मुद्दे६५ वर्षांची परंपरा : बघ्यांची मोठी गर्दी, शंभर वर्षांपूर्वीचे प्राचीन हनुमान मंदिर

आॅनलाईन लोकमत
बडनेरा : जुन्या वस्तीतील बारीपुरास्थित हनुमान मंदिरात ६५ वर्षांपासून बंड्या ओढण्याची परंपरा जोपासली जात आहे. यंदाही एकट्या हनुमान भक्ताने नऊ बंड्या ओढल्याचे तेथील उपस्थित शेकडो भाविकांनी अनुभवले. हा क्षण अवलोकणासाठी हनुमान भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती.
बारीपुरास्थित शंभर वर्षांपूर्वीच्या प्राचीन हनुमान मंदिरात ६५ वर्षांपूर्वी रूपलाल जाट या हनुमान भक्ताने बंड्या ओढण्याची परंपरा सुरू केली होती. तेव्हापासून दरवर्षी बारी पंचायत फंड व हनुमान जयंती उत्सव समिती ही परंपरा आजतागायत जोपास आहे. अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत हनुमान भक्ताने भरलेल्या तसेच एकाला एक बंड्या जुंपून असणाºया नऊ बंड्या एका हनुमान भक्ताने ओढल्या. हा प्रसंग प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी बडनेरासह परिसरातील हनुमान भक्तांनी मोठी गर्दी केली होती. या मंदिरात दरवर्षी हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाप्रसादाचा लाभही शेकडो भाविक आनंदाने घेतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचाºयांसह कमाण्डोंचा ताफा तैनात करण्यात आला होता. बंड्या ओढण्याच्या कार्यक्रमानंतर महाआरती करण्यात आली.

Web Title: Nineteen vandalized by Hanuman devotees in Badnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.