निपाह व्हायरस : आरोग्य यंत्रणा अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 11:11 PM2018-05-25T23:11:41+5:302018-05-25T23:12:32+5:30

केरळ येथे निपाह विषाणूमुळे उद्भवणाऱ्या आजाराचा उद्रेक पाहता, अमरावती जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. निपाह आजाराच्या उपाययोजनेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. सद्यस्थिस्तीत नागरिकांनी केरळ व बांग्लादेशचा प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Nipah Virus: Health System Alert | निपाह व्हायरस : आरोग्य यंत्रणा अलर्ट

निपाह व्हायरस : आरोग्य यंत्रणा अलर्ट

Next
ठळक मुद्देकेरळ, बांग्लादेश प्रवास टाळा : जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष कक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केरळ येथे निपाह विषाणूमुळे उद्भवणाऱ्या आजाराचा उद्रेक पाहता, अमरावती जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. निपाह आजाराच्या उपाययोजनेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. सद्यस्थिस्तीत नागरिकांनी केरळ व बांग्लादेशचा प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
केरळमध्ये निपाहमुळे आतापर्यंत नऊ जणांचा बळी गेला. या आजाराचा उद्रेक झाला असून, तो अन्य राज्यात पसरू नये, याची खबरदारी आरोग्य विभाग घेत आहे. या आजाराचा महाराष्ट्र राज्याला फारसा धोका नसला तरी राज्यभरात खबरदारी घेतल्या जात आहे. निपाहसदृश आजाराचे सर्वेक्षण सुरू झाले असून, प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपापयोजना आखल्या जात आहेत. निपाह विषाणू सर्वप्रथम १९९८ मध्ये मलेशियामध्ये आढळून आला होता. भारतात सिलिगुडी (२००१) आणि नाडिया (२००७) या पश्चिम बंगालच्या भागात या विषाणूचा उद्रेक यापूर्वीच झाला होता. बांग्लादेशात या आजाराचा उद्रेक दरवर्षीच दिसून येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे या विषाणूचा प्रसार होऊ नये, याची खबरदारी जिल्ह्यात घेतली जात आहे.
मागील तीन आठवड्यात केरळमधील कोझिकोडे परिसरात, ईशान्य भारतात किंवा बांग्लादेश सीमेलगतच्या भागात प्रवास करणाºयांना जर निपाहची लक्षणे आढळून आली असले, त्यांनी त्वरित आरोग्य यंत्रणेशी संपर्क करणे आवश्यक आहे.
विषाणूचा प्रसार होतो कसा?
निपाह विषाणूचा प्रसार हा फळांवर जगणाºया वटवाघळांमार्फत होतो. वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने अथवा खाल्ल्याने हा आजार होतो. डुक्कर आणि इतर पाळीव प्राणी यांनादेखील निपाहची बाधा होऊ शकते. निपाह विषाणूची लागण संसर्गातून दुसºया माणसाला होऊ शकते. रुग्णावर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी, रुग्णसेवा करणारे नातेवाईक यांनाही लागण होऊ शकते. वटवाघळाच्या स्रावामुळे दूषित झालेला खजुराच्या झाडाचा रस पिल्यानेदेखील या विषाणूचा प्रसार होतो.
शेतात, जंगलात पडलेली फळे खाणे टाळा
निपाह विषाणुमुळे होणारा आजार हे वटवाघळाच्या स्रावातून पसरतो. वटवाघूळ हे शेतात किंवा जंगलात झाडावरील फळे खातात. त्यामुळे तेथील फळामध्ये वटवाघळांचा स्राव असू शकतो. त्यामुळे शेतात व जंगलात पडलेली फळे खाऊ नका, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.
लक्षणे
निपाह विषाणूमुळे उद्भवणाऱ्या आजारात ताप, अंगदुखी, डोकेदुखी, झोपाळूपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात.
उपचार
निपाह विषाणू आजारावर कोणतेही औषध नाही. रॅबाविरिन हे विषाणुरोधी औषध वापरले जात असले तरी मुख्यत्वे लक्षणाधारित उपचार आणि साह्यभूत शुश्रुषा यावर भर दिला जातो.

निपाह विषाणूच्या निदानासाठी आरटीपीसीआर पद्धतीने घसा, नाक, स्राव, मूत्र व रक्त नमुन्यांची तपासणी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था येथे करण्यात येते.

निपाह विषाणूमुळे होणाºया आजाराची खबरदारी आरोग्य यंत्रणेमार्फत घेतल्या जात आहे. नागरिकांनी केरळ व बांग्लादेशातील प्रवास टाळावा. ज्यांनी आठ दिवसांपूर्वी केरळ व बांग्लादेशात प्रवास केला असेल आणि निपाहची लक्षणे आढळून आली असतील, त्यांनी त्वरित जवळच्या आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा.
- श्यामसुंदर निकम
जिल्हा शल्यचिकित्सक
अमरावती.

Web Title: Nipah Virus: Health System Alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.