निशांत वानखडेचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:10 AM2021-06-18T04:10:26+5:302021-06-18T04:10:26+5:30
विधी सूत्रानुसार, डॉ. निशांत वानखडेने एका महिलेला अविवाहित असल्याचे सांगत लग्नाचे आमिष दाखविले. तिच्याशी प्रेमसंबध प्रस्थापित केल्यानंतर लैंगिक ...
विधी सूत्रानुसार, डॉ. निशांत वानखडेने एका महिलेला अविवाहित असल्याचे सांगत लग्नाचे आमिष दाखविले. तिच्याशी प्रेमसंबध प्रस्थापित केल्यानंतर लैंगिक अत्याचार केला. पीडिताच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी डॉ. निशांत वानखडेविरुद्ध गुन्हा नोंदविला. पोलिसांनी २७ मे रोजी त्याला अटक केली व कोठडीत चौकशीनंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. ३० मे रोजी त्याने वकिलामार्फत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. गुरुवारी न्यायाधीश सिन्हा यांच्या न्यायालयात त्यावर सुनावणी करताना प्रकरणाशी संबंधित सर्व दस्तावेजांची पाहणी केली. यावेळी न्यायालयात पीडित महिला आणि त्यांचे वकील राजेश कैथवास हजर होते. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे ॲड. प्रफुल्ल पी. तापडिया यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने डॉ. निशांत वानखडेचा जामीन अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणाचा तपास गाडगेनगरच्या पोलीस उपनिरीक्षक मनीषा सामटकर करीत आहेत.