नितेश सावळापूरकर टॉपर, राजश्री गणोरकर द्वितीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 11:19 PM2018-06-08T23:19:54+5:302018-06-08T23:22:30+5:30
मार्च-२०१८ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालयाचा नितेश हेमंत सावळापूरकर याने ५०० पैकी ४९७ गुण (९९.४० टक्के) मिळवून जिल्ह्यात अव्वल ठरला, तर याच शाळेची राजश्री संजय गणोरकर हिने द्वितीय क्रमांक मिळविला. तिला ४९६ गुण (९९.२० टक्के) मिळालेत. जिल्ह्यात एकूण उत्तीर्ण टक्केवारी ८६.४९ आहे. यंदा निकालात मुलींचीच सरशी ठरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मार्च-२०१८ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालयाचा नितेश हेमंत सावळापूरकर याने ५०० पैकी ४९७ गुण (९९.४० टक्के) मिळवून जिल्ह्यात अव्वल ठरला, तर याच शाळेची राजश्री संजय गणोरकर हिने द्वितीय क्रमांक मिळविला. तिला ४९६ गुण (९९.२० टक्के) मिळालेत. जिल्ह्यात एकूण उत्तीर्ण टक्केवारी ८६.४९ आहे. यंदा निकालात मुलींचीच सरशी ठरली आहे.
तृतीय क्रमांकाचे मानकरी स्थानिक गोल्डन किड्सचा निखिल आलोक देशपांडे, जान्हवी दिनेश भटकर, ज्ञानमाता हायस्कूलची श्रावणी सुनील देशमुख, तर अंजनगाव सूर्जी येथील सीताबाई संगई विद्यालयाची क्षितीजा बोबडे, धनश्री खरपकर यांनी ४९५ गुण मिळविले. त्यांच्या निकालाची टक्केवारी ९९ आहे.
जिल्ह्यातून प्रथम आणि द्वितीय येण्याचा सन्मान यंदा दर्यापूरच्या प्रबोधन विद्यालयाला मिळाला. मात्र, स्थानिक गोल्डन किड्स, ज्ञानमाता हायस्कूल, समर्थ हायस्कूल, नूतन कन्या शाळा, अंजनगाव सूर्जी येथील सीताबाई संगई विद्यालयाने निकालात आघाडी घेतली. होलीक्रॉस हायस्कुलच्या २४५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९९.५९ आहे. गोल्डन किड्सच्या ३०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३०७ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. मणिबाई गुजराती मराठी शाळेचा निकाल ९३.३३ टक्के लागला. मणिबाई गुजराती इंग्लिश शाळेचा निकाल ९७ टक्के लागला. अरूणोदय विद्यालयाचा निकाल १०० टक्के आहे. समर्थ विद्यालयाचा निकाल ९६.८० टक्के लागला. भंवरीलाल सामरा इंग्लिश स्कूलचा १०० टक्के, नारायणदास लढ्ढा हायस्कूल ९७.६५, ज्ञानमाता हायस्कूल निकाल ९९ टक्के लागला आहे. हे नीतेशच्या श्रमाचे मोल असून, याला शिक्षकवृंदाचे सहकार्य मिळाले आहे, असे प्रबोधनचे प्राचार्य मेधा धर्माधिकारी म्हणाल्या. विदर्भ प्रबोधन मंडळ कार्यकारिणीचे अध्यक्ष रवी गणोरकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सात विषयांचा निकाल १०० टक्के
एकूण ३२ विषयांसाठी दहावीची परीक्षा घेण्यात आली. त्यात फिजिओलॉजी हायजिन, टुरिझम अॅन्ड ट्रव्हल्स, कृषी, हिंदी उर्दू, हिंदी पाली, मूलभूत तंत्रज्ञान व एलिमेंट्स आॅफ इलेक्ट्रॉनिक्स टेक्नालॉजी या सात विषयांचा निकाल १०० टक्के लागला. मराठीचा निकाल ८७.८९ टक्के, हिंदीचा ७७.४०, तर इंग्रजी विषयाचा निकाल ९९.४६ टक्के लागला आहे.
७,९८७ मुले प्रावीण्यप्राप्त
जिल्ह्यातील ४३०१४ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ४२८२३ विद्यार्थ्यानी परीक्षा दिली. पैकी ७,९८७ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले.१३२६१ मुलांनी प्रथम श्रेणी, १२३२७ मुलांनी द्वितीय श्रेणी, तर ३,०२२ मुलांना ४९ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले.
गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा ‘लोकमत’तर्फे सन्मान
इयत्ता १० व १२ वीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांचा ‘लोकमत’ अस्पायर एज्युकेशन प्रदर्शनीत सन्मानित केले जाणार आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची छायाप्रत सोबत आणावी लागेल. या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जात असून, संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ही प्रदर्शनी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आली आहे.
यंदाही मुलींचाच निकालावर वरचष्मा
निकालावर यंदाही मुलींचाच वरचष्मा असून जिल्ह्यातून उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ८९.५९ टक्के, तर मुलांची टक्केवारी ८१.७२ आहे. मार्च २०१८ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत अमरावती जिल्ह्यातून २२,५६३ मुलांनी, तर २०,४५१ मुलींनी नोंदणी केली होती. मुले व मुली मिळून एकूण ४३,०१४ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. यापैकी २२,४५३ मुलांनी, तर २०,३७० मुलींनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. एकूण ४२८२३ परीक्षार्थ्यांपैकी १८३४८ मुले, तर १८,२४९ मुली उत्तीर्ण झाल्यात. एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ३६,५९७ आहे. या आकेडवारीनुसार उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८१.७२, तर मुलींची टक्केवारी ८९.५९ इतकी आहे. निकालाची एकूण टक्केवारी ८५.४६ टक्के इतकी आहे.
धारणी आघाडीवर; अंजनगाव सुर्जी माघारले
इयत्ता दहावीच्या परीक्षेत निकालात जिल्ह्यातून धारणी तालुका आघाडीवर आहे. एकूण ३७ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आलेल्या परीक्षेत २,६२० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १२१४ मुले तर १,१२६ मुली उत्तीर्ण झाल्या असून, ही संख्या २,३४० आहे. टक्केवारीनुसार ८७.४० मुले, तर ९१.४७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. एकूण निकालाची टक्केवारी ८९.३१ आहे. जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी निकालात माघारले आहे. ४७ शाळांमध्ये २,५६० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १,०४८ मुले, तर १,०७५ मुली उत्तीर्ण झाल्या असून, ही संख्या २१२३ आहे. टक्केवारीनुसार ७६.७८ मुले तर ८९.९६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तालुक्यात एकूण निकालाची टक्केवारी ८२.९३ एवढी आहे.
१०० % निकाल देणाऱ्या ५१ शाळा
जानी शायदा उर्दू हायस्कूल, शिराळा, पॅराडाईज इंग्लिश स्कूल, कॅम्प, भंवरीलाल सामरा इंग्लिश स्कूल, अंजुमन उर्दू नुरनगर, अरुणोदय इंग्लिश स्कूल, बुलिदान राठी मूकबधिर शाळा, साईनगर, तखतमल इंग्लिश स्कूल, एडी कॉन्व्हेंट वलगाव, इंग्लिश सैफी ज्युबिली हायस्कूल पॅराडाईज कॉलनी, राष्ट्रीय एकता उर्दू हायस्कूल भातकुली, सुखदेवराव पाटील माध्यमिक विद्यालय, वडुरा, शाह अंजुमन उर्दू हायस्कूल लोणी टाकळी, व्ही. ई.एस. इंग्लिश स्कूल, नांदगाव खंडेश्वर, समता विद्यालय, जळका जगताप, नगरपरिषद आझाद उर्दू चांदूर रेल्वे, जिंगलबेल इंग्लिश स्कूल चांदूररेल्वे, लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूल, तिवसा, फातिमा उर्दू हायस्कूल अंबाडा, गंगुबाई ठाकरे स्मृती विद्यालय, हातुर्णा, शांतीनिकेतन इंग्लिश स्कूल,वरुड, श्री गाडगेबाबा आश्रमशाळा नागरवाडी, कुरळपूर्णा विद्यालय, कोठारी इंग्लिश स्कूल, अबदलापूर, जगदंबा पबिलक स्कूल, चांदूरबाजार, आदर्श विद्यालय, भूगाव, फातिमा कॉन्व्हेंट, अचलपूर, शहजाद उर्दू हायस्कूल मोगलाईपुरा परतवाडा, सीतारामजी गणोरकर इंग्लिश स्कूल, अचलपूर, अॅव्हेंट ग्रेड पब्लिक स्कूल, अमरावती, शासकीय मुलींची निवासी शाळा, बुरडघाट, ब्ल्यू बेल्स कॉन्व्हेंट चावलमडी, अचलपूर, श्रीमती कृष्णाबाई सारडा अंजनगाव सुर्जी, के. बारब्दे विद्यालय चिंचोली बु।, अनुसूचित जाती नवबौद्ध निवासी शाळा पांढरी, तुळशीराम पाटील विद्यालाय, नालवाडा, जवाहरलाल विद्यालय, आराळा, सर एस. ए. उर्दू गर्ल्स हायस्कूल येवदा, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय मार्कंडा, ज्ञानपीठ कॉन्व्हेंट दर्यापूर, मुलांची निवासी शाळा, सामदा, क्रिसेंट उर्दू हायस्कूल, अमरावती, दीपशिखा गुरुकुल सैनिक शाळा, चिखलदरा, आदिवासी पोस्ट बेसिक आश्रमशाळा, हतरू, जामली शाळा, संत साईबाबा स्कूल भिरोजा, कस्तुरबा गांधी विद्यालय, धारणी, पोस्ट बेसिक आश्रमशाळा, हरिसाल, वर्धे इंग्लिश हायस्कूल धारणी, ख्वाजा उर्दू हायस्कूल, धारणी व मोन्टफोर्ट प्रयमरी स्कूल, धारणी या ५१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
नितेश होणार प्रशासकीय अधिकारी!
अमरावती : इयत्ता दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून अव्वल आलेला नितेश सावळापूरकर याने प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवेत जायचे असल्याबाबत ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तत्पूर्वी बारावीनंतर आयआयटीमधून इंजिनिअर होण्याचे त्याचे स्वप्न आहे. इयत्ता नववीत असताना नितेश याने इयत्ता नववीत महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम स्थान पटकाविले आहे. इयत्ता दहावीत मिळविलेल्या यशाबद्दल हरकून न जाता प्रशासकीय सेवेत रूजू होऊन देशसेवा करण्याचे त्याचे ध्येय असल्याचे नीतेश सांगतो. भविष्यात यूपीएससीच्या माध्यमातून मोठे यश पदरात पाडून घेणे हे आपले ध्येय असल्याचे तो म्हणाला. पहाटे ४ वाजता उठून नियमित अभ्यासाचे नियोजन तो करीत होता. अभ्यासात सातत्य ठेवून व मनावर कुठलेही दडपण न येऊ देता त्याने केवळ अभ्यास केल्यास यश हमखास मिळते, असा संदेशही त्याने इतर विद्यार्थ्यांना दिला. नीतेशचे चौथीपर्यंतचे शिक्षण प्रबोधन गीता मंडळ येथे झाले. तो दर्यापूर येथील रुख्मिणीनगरातील रहिवासी असून, त्याचे वडील दर्यापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. नितेशची आई उच्चशिक्षित असून, गृहिणी आहे. त्याला अभ्यासासाठी अनुकूल वातावरण मिळण्यास आईने सतत केलेल्या प्रयत्नाचे हे यश असल्याची कबुलीही त्याने दिली. मोठा भाऊ व्यंकटेश हा आयआयटी मुंबई येथे बी. टेकच्या द्वितीय वर्षात शिकत आहे.