चिखलद-याच्या विकासासाठी ‘एएमआरडी’, विदर्भातील सिंचनाचा प्रश्न सुटेल - नितीन गडकरी :

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 06:33 PM2017-10-10T18:33:57+5:302017-10-10T18:34:13+5:30

मी केंद्रात असलो तरी राज्यात पूर्णत: लक्ष आहे. विशेषत: विदर्भातील प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जात असून येत्या काळात समूळपणे सिंचनाचा प्रश्न सुटेल, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ, जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.

Nitin Gadkari: 'Amridi' will go away for irrigation projects in Vidarbha: Chidambaram | चिखलद-याच्या विकासासाठी ‘एएमआरडी’, विदर्भातील सिंचनाचा प्रश्न सुटेल - नितीन गडकरी :

चिखलद-याच्या विकासासाठी ‘एएमआरडी’, विदर्भातील सिंचनाचा प्रश्न सुटेल - नितीन गडकरी :

googlenewsNext

अमरावती : मी केंद्रात असलो तरी राज्यात पूर्णत: लक्ष आहे. विशेषत: विदर्भातील प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जात असून येत्या काळात समूळपणे सिंचनाचा प्रश्न सुटेल, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ, जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.
नितीन गडकरी हे अमरावतीत मंगळवारी कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य शासनाशी संबंधित प्रश्नांवर बोलणे टाळले. परंतु विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलद-याच्या विकासासाठी नागपूरच्या धर्तीवर अमरावती विकास प्राधिकरण (एएमआरडी) स्थापन करण्याची तयारी दर्शविली. ना.गडकरी यांनी पर्यटनाला चालना दिल्याशिवाय गाव, शहराची प्रगत होणार नाही, ही बाब आवर्जून सांगितली. शिर्डी विमानतळाचा विकास झाला त्यातुलनेत बेलोरा विमानतळाच्या विकासाने गती घेतलेली नाही, प्रसार माध्यमांच्या या प्रश्नावर बोलताना त्यांनी लवकरच यासंदर्भात केंद्रात बैठक बोलावून बेलोरा विमानतळाचे रखडलेले प्रश्न, विकासकामांना गती मिळेल, असे ठामपणे सांगितले. सिमेंट क्रॉक्रिटने निर्मित रस्त्याचे जाळे विणले जात असून यापूर्वी रस्ते डांबरीकरणात झालेले अपहार, भ्रष्टाचारातून मुक्ती मिळेल, असे ते म्हणाले. अमरावती येथे दाजीसाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या तपोवन कुष्ठधाम संस्थेच्या विकासावर लक्ष दिले जाईल. येत्या काही दिवसांत शिवाजी ऊर्फ दादीसाहेब पटवर्धन व संत गुलाबराव महाराज यांचे टपाल तिकिटांचे प्रकाशन केले जाईल, असे गडकरी म्हणाले. कौटुंबिक कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री प्रवीण पोटे, आ.सुनील देशमुख, महापौर संजय नरवणे, आ.अनिल बोंडे, महापालिका स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, प्रभाताई मराठे, संध्या मराठे, विलास मराठे, विवेक मराठे, विनोद मराठे, अतुल आळशी, संजय अग्रवाल, अरविंद मराठे, किरण पातुरकर, जयंत डेहनकर आदी उपस्थित होते.

गडकरींचा भावपूर्ण सत्कार
नितीन गडकरी हे अमरावतीत कौटुंबिक कार्यक्रमासाठी आले असता त्यांचा ‘हिंदूस्थान’ परिवाराच्यावतीने भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी मराठे कुटुंबीयांनी ना.गडकरी यांचा भलामोठ्या गुलाब पुष्पहाराने सत्कार केला. यावेळी ग्रंथ भेट देण्यात आला.

Web Title: Nitin Gadkari: 'Amridi' will go away for irrigation projects in Vidarbha: Chidambaram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.