जिल्ह्यातील ३ हजार ९१७ पाणी स्रोतांमध्ये नायट्रेट

By admin | Published: April 15, 2015 12:10 AM2015-04-15T00:10:16+5:302015-04-15T00:10:16+5:30

जिल्ह्यातील पाणी स्त्रोताच्या नमुन्यांच्या रासायनिक तपासणीत तब्बल ३ हजार ९१७ नमुन्यांमध्ये मानवी शरीराला घातक ठरणारा...

Nitrate in 3 thousand 9 17 water sources in the district | जिल्ह्यातील ३ हजार ९१७ पाणी स्रोतांमध्ये नायट्रेट

जिल्ह्यातील ३ हजार ९१७ पाणी स्रोतांमध्ये नायट्रेट

Next

नागरिकांच्या आरोग्याला धोका : शासकीय आरोग्य प्रयोगशाळेचा अहवाल
वैभव बाबरेकर अमरावती
जिल्ह्यातील पाणी स्त्रोताच्या नमुन्यांच्या रासायनिक तपासणीत तब्बल ३ हजार ९१७ नमुन्यांमध्ये मानवी शरीराला घातक ठरणारा नायट्रेट सर्वाधिक प्रमाणात आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
पाणी जीवन आहे. मात्र, दिवसेंदिवस जिल्ह्यात दूषित पाणी अधिक प्रमाणात आढळून येत आहे. दूषित पाण्यामुळे सर्वाधिक आजार बळावतात.
दूषित पाण्यामुळे ताप, डायरिया, टायफाईड यासारख्या आजाराच्या विळख्यात नागरिक सातत्याने सापडत आहे.
शुद्ध पाणी वापराबाबत शासन, प्रशासन आणि नागरिक सर्वांमध्येच उदासीनता जाणवते.

नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळल्यास मानवी शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अवयवांना आॅक्सिजनचा पुरवठा कमी होतो. अशक्तपणा निर्माण होते. नायट्रेटच्या अतिप्रमाणाने डायरीया होतो.
- संतोष माने,
अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी.

मार्च महिन्यात आढळले
आठ टक्के दूषित नमुने
जिल्ह्यातील विविध पाणी स्रोतांच्या मार्च महिन्यात केलेल्या तपासणीत आठ टक्के नमुने दूषित आढळून आले. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत ३ हजार १०६ पाणी नमुन्यांची अनुजीव तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २५० नमुने दूषित आढळून आलेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील २१९ व शहरी भागातील ३१ पाणी नमुने दूषित आहेत. दूषित पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Nitrate in 3 thousand 9 17 water sources in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.