निजामपूरला वादळाचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:17 AM2021-04-30T04:17:13+5:302021-04-30T04:17:13+5:30
घरावरील छप्पर गावातील वृक्ष कोलमडून पडलेत : शेतकऱ्यांची एकच धावपळ फोटो पी २९ निजामपूर परतवाडा: अचलपूर तालुक्यातील ...
घरावरील छप्पर
गावातील वृक्ष कोलमडून पडलेत : शेतकऱ्यांची एकच धावपळ
फोटो पी २९ निजामपूर
परतवाडा: अचलपूर तालुक्यातील निजामपूर गावात बुधवारी रात्रीला अकरा वाजता चे दरम्यान वादळाने चांगलेच थैमान घातले. यात गावातील नऊ ते दहा घरांवरील टिन उडालेत. घरावरील छप्पर कोसळले. तर गावातील कडूनिंबची मोठी झाडे उलमडून पडलीत.
निजामपुर गाव झोपायच्या तयारीत असतानाच अचानक आलेल्या या वादळामुळे गावकरी चांगलेच भयभीत झाले होते. यात शेतीतील पिकाचेही नुकसान झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
या वादळाची माहिती रात्रीलाच गावकऱ्यांनी तालुका प्रशासनास दिली.
दरम्यान गुरुवारी अचलपूर तालुक्यात दुपारी ३.३० ते चार वाजेच्या दरम्यान वादळ झाले. थोडेबहुत पावसाचे थेंबही पडलेत. वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शेतातील कांदा झाकन्याकरिता शेताकडे धाव घेतली. लगतच्या ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांनी परतवाडा शहर गाठून शेतातील पिक झाकन्या करिता वेळेवर जाड प्लास्टिक व ताडपत्री विकत नेल्यात. याकरिता ओळखीच्या दुकानदारांना फोन लावून ती दुकाने वेळेवर त्यांनी उघडायला लावली. यात त्या दुकानदारांनीही गरजू शेतकऱ्यांना तेवढ्याच तातडीने मदतही केली.
दरम्यान या वादळामुळे व वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अचलपुर परतवाडा शहरासह ग्रामीण भागात विजेचे येणे जाणे सुरू होते. वीज पुरवठा अधून मधून खंडीत होत होता.