महापालिकेला मिळेना लेखी परीक्षेचा मुहूर्त !
By Admin | Published: June 17, 2016 12:09 AM2016-06-17T00:09:57+5:302016-06-17T00:41:46+5:30
तब्बल आठ वर्षांनंतर प्रभारींचे ग्रहण सुटण्याचे संकेत असताना पालिका प्रशासनाला मात्र अद्यापही लेखी परीक्षेचा मुहूर्त गवसलेला नाही.
उस्मानाबाद : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते हे दीड महिन्याच्या प्रशिक्षणासाठी जाणार असल्याने या पदाची सूत्रे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते यांच्याकडे गुरूवारी सायंकाळी सोपविण्यात आली.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांना शासनाने ‘आएएस’ केडर बहाल केले आहे. यासाठीचे प्रशिक्षण पश्चिम बंगालमधील कोलकत्ता येथे घेण्यात येते. दीड महिन्याच्या सदरील प्रशिक्षणासाठी ते जात असल्याने गुरूवारी त्यांनी आपल्या पदाची सूत्रे डॉ. सातपुते यांच्याकडे सोपविली. प्रभारी ‘सीइओ’ म्हणून तुर्तातास तरी त्या दीड महिना काम पाहणार आहेत. दरम्यान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उबाळे हे सेवानिवृत्त झाल्यामुळे हेही पद रिक्त आहे. या पदाचा पदभार डॉ. सातपुते यांच्याकडे होता. परंतु, त्यांच्याकडे आता सीईओ पदाची सूत्रे आल्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे कोणाच्या हाती जाणार हे, शुक्रवारीच स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)