महापालिकेला आठ नॉन इन्व्हेन्सिव्ह पोर्टेबल व्हेन्टीलेशन डिव्हाईस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:06 AM2021-05-04T04:06:30+5:302021-05-04T04:06:30+5:30
अमरावती : कोरोनाला प्रतिबंधासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेला मदतीचा हात दिला आहे. ना. गडकरी यांनी ...
अमरावती : कोरोनाला प्रतिबंधासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेला मदतीचा हात दिला आहे. ना. गडकरी यांनी पाठविलेले आठ नॉन इन्व्हेन्सिव्ह पोर्टेबल व्हेन्टीलेशन डिव्हाईस महापौर चेतन गावंडे यांनी आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे सोमवारी सुपूर्द केले. हेडगेवार हॉस्पिटल दोन नॉन इन्व्हेन्सिव्ह पोर्टेबल व्हेन्टीलेशन डिव्हाईस यावेळी देण्यात आले.
ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत होऊ नये म्हणून डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला २० क्युबिक मीटरचा ऑक्सिजन प्लांट सीएसआर फंडातून उभारण्याचे ना.नितीन गडकरी यांनी कबूल केले. त्यानुसार येत्या आठवड्यात प्लांट उभारणीला प्रारंभ होत असल्याची माहिती तुषार भारतीय यांनी दिली. हा उपक्रम सुरू असताना १० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर महापालिकेला त्वरित देण्यात येत आहे, असा संदेश आल्याचे भारतीय म्हणाले. शहरासाठी २० व्हेंटिलेटर्स सुपूर्द करण्यात आले. त्यातील १० व्हेंटिलेटर्स डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला, १० व्हेंटिलेटर्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला देण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.
यावेळी उपमहापौर कुसूम साहू, स्थायी समिती सभापती सचिन रासने, नगरसेवक संजय नरवणे, सुनील काळे, राजेश साहू, श्रीचंद तेजवाणी, उपायुक्त सुरेश पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, जयश्री नांदुरकर, हेडगेवार हॉस्पिटलचे अजय श्रॉफ, महेश जोग, बोधनकर, राठोड उपस्थित होते.