चर्चा नको, आता 'रिझल्ट' हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 05:00 AM2019-11-17T05:00:00+5:302019-11-17T05:00:41+5:30

केंद्रातून निधी खेचून आणण्याकरिता माझे प्रयत्न राहील, काहीही काम असेल तर माझ्याशी थेट संपर्क करा. मात्र पुढील बैठकीत अडचणींवर चर्चा होणार नाही, तर 'रिझल्ट' लागेल, अशी तंबी खासदार नवनीत राणा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिली.

No discussion, now want 'release' | चर्चा नको, आता 'रिझल्ट' हवा

चर्चा नको, आता 'रिझल्ट' हवा

Next
ठळक मुद्देनवनीत राणा। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजवा, अपूर्ण कामांचे नियोजन करून ती तातडीने मार्गी लावा, केंद्रातून निधी खेचून आणण्याकरिता माझे प्रयत्न राहील, काहीही काम असेल तर माझ्याशी थेट संपर्क करा. मात्र पुढील बैठकीत अडचणींवर चर्चा होणार नाही, तर 'रिझल्ट' लागेल, अशी तंबी खासदार नवनीत राणा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या सभागृहात खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील विकासात्मक कामांचा आढावा घेतला. जिल्ह्यात सुरू असलेले केंद्रीय मार्ग निधी, हायब्रीड अ‍ॅन्युईटी, प्रमुख मार्गाची कामे, राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा त्यांनी यावेळी अधिकाºयांकडून माहिती घेतली. शहरातील सुरू झालेली पण प्रलंबित असलेली कामे तातडीने मार्गी लावावे, लोकांना त्रास होता कामा नये, अशी सूचना खासदारांनी केली. ेचिखलदरा-घटांग मार्गावरील काही किलोमीटरचा मार्ग वनविभागाच्या क्षेत्रातून आहे. परंतु हा मार्ग सुरळीत करण्यास वनविभागाची अद्यापही मंजुरी अप्राप्त आहे. याविषयीचा प्रस्ताव द्या, या कामाकरिता पुढाकार घेते, अशी ग्वाही त्यांनी दिली.
गाडगेनगर ते शेगाव नाक्यापर्यंतचा प्रस्तावित उड्डाणपूल, भातकुली तालुक्यातील पेढी नदीवर नवीन पुलाचे बांधकाम, बडनेरा रेल्वे उड्डाणपूल, नवाथेजवळील डांबरीकरणाच्या रस्त्याचे काम, जिल्ह्यातील पर्यटन विकास आरखडा व इतर अनेक निधीअंतर्गत प्रस्तावित कामे, तसेच बजेटमध्ये टाकलेल्या कामांचा खासदारांनी आढावा घेतला. बैठकीला कार्यकारी अभियंता सदानंद शेंडगे, दर्यापूरचे अनिल जवंजाळ, एसपीडीच्या कार्यकारी अभियंता विभावरी वैद्य, अचलपूरचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे यांच्यासह उपविभागीय अभियंता उपस्थित होते. तसेच सुनील राणा, आशिष कावरे, नितीन बोरेकर, गिरीश कासट, सचिन भेंडे, विनोद गुहे आदी उपस्थित होते.

Web Title: No discussion, now want 'release'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.