मास्क नाही, काढा उठाबशा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 05:00 AM2020-04-14T05:00:00+5:302020-04-14T05:00:10+5:30

देशभर लॉकडाऊन आहे. घराबाहेर फिरण्यास सक्त मनाई आहे. सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत आवश्यक कामासाठीच बाहेर निघण्याची मुभा संचारबंदीच्या काळात देण्यात आली आहे. त्यासाठी सुरक्षित अंतर तोंडाला मास्क बांधणे सक्तीचे करण्यात आले, ही सुरक्षा नागरिकांच्या स्वत:च्या आरोग्यासाठी असतानाही परतवाडा, अचलपूर या जुळ्या शहरातील काही नागरिक काही ऐकच नसल्याचे चित्र आहे.

No mask, Get up! | मास्क नाही, काढा उठाबशा!

मास्क नाही, काढा उठाबशा!

Next
ठळक मुद्देवाहनांची काढली हवा : वारंवार सांगूनही नागरिक ऐकेना, नगरपालिका प्रशासन सक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : जगावर कोरोनाचे भयंकर संकट ओढावले असताना जुळ्या शहरातील नागरिक सुरक्षिततेसंबंधी उपाययोजनांवर अंमल करण्याच्या स्थितीत नाहीत. तोंडाला मास्क न बांधणाऱ्यांना सोमवारी अचलपूर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सक्त होत प्रत्येकी शंभर उठाबशा आठवडी बाजारातच काढायला लावल्या. यात जवळपास २० नागरिक सहभागी झाले. अकारण बाहेर फिरणाºया काही नागरिकांच्या वाहनांच्या चाकाची हवा सोडण्यात आली
देशभर लॉकडाऊन आहे. घराबाहेर फिरण्यास सक्त मनाई आहे. सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत आवश्यक कामासाठीच बाहेर निघण्याची मुभा संचारबंदीच्या काळात देण्यात आली आहे. त्यासाठी सुरक्षित अंतर तोंडाला मास्क बांधणे सक्तीचे करण्यात आले, ही सुरक्षा नागरिकांच्या स्वत:च्या आरोग्यासाठी असतानाही परतवाडा, अचलपूर या जुळ्या शहरातील काही नागरिक काही ऐकच नसल्याचे चित्र आहे. त्यावर आता अचलपूर नगरपालिकेने सोमवारी सकाळी आठवडी बाजारातील परिसरात तोंडाला मास्क न बांधणाऱ्यां नागरिकांना उठाबशा काढायला लावल्या. पथकात अचलपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, बांधकाम अभीयंता रमेश तायडे, आरोग्य विभागाचे जहीर, पाणीपुरवठ्याचे पोटे यांच्यासह कर निरीक्षक व कर्मचारी सहभागी झाले होते.
संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांनी प्रसाद दिला, तर कुठे पुष्पगुच्छ देऊन स्वागतही केले. महसूल, नगरपालिका, पोलीस प्रशासनाच्यावतीने रात्रंदिवस घराबाहेर न निघण्याच्या सूचना मोबाइल, लाऊडस्पीकर अशा विविध माध्यमांतून दिल्या जात आहेत. तरीसुद्धा नागरिक कशाचीच भीती न बाळगता सूचनांचे पालन करता दिसत नाहीत.
नेहमीप्रमाणे फिरत असल्याचे चित्र संचारबंदी काळात आहे. सर्वसामान्य नागरिकांना औषधे, किराणा, भाजी खरेदीसाठी दिलेली सूट मोजक्या टवाळखोरांमुळे सर्वांना वेठीस धरणारी ठरली आहे. अचलपूर नगरपालिका पथकामार्फत परतवाडा शहरातील सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या.
बँकांसमोर वाहने लावून लोकांना उभे राहण्यास अडचण निर्माण करणाऱ्या वाहनांचीसुद्धा हवा सोडण्यात आली.

सूचना संपल्या; आता आर्थिक दंड
वारंवार सांगूनही नागरिक ऐकत नसल्याने अचलपूर नगरपालिकेच्या कोरोनाविरोधी पथकाने आता यापुढे आर्थिक दंड आकारणीसुद्धा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे त्यानुसार आता दंड आकारला जाणार आहे.

Web Title: No mask, Get up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस