व्यावसायिक प्रतिष्ठानात ‘नो मास्क नो एन्ट्री’चे फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:13 AM2021-03-19T04:13:23+5:302021-03-19T04:13:23+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अनेक व्यावसायिक प्रतिष्ठानात ...
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अनेक व्यावसायिक प्रतिष्ठानात ‘नो मास्क नो एन्ट्री’ असे फलक दुकानांचा दर्शनी भागात दिसू लागले आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे प्रशासनाने दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केले असून, त्यानुसार जिल्हा प्रशासनानेही जिल्ह्यासाठी यापूर्वी घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना अधिनस्थ यंत्रणेला दिले आहेत. शासकीय कार्यालयात २५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थितीच्या सूचना आहेत. आरोग्य विभाग आणि अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती मात्र ‘जैसे थे’ आहे. बाजारपेठेत नागरिकांची गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार व्यावसायिकांनीही दिलेल्या सूचनेप्रमाणे अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी १८ मार्चपासून बाजारपेठ उघडण्याची वेळ सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंतची वेळ आहे. या वेळेत उघडण्यात येणाऱ्या व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये ‘नो मास्क नो एन्ट्री’चे फलक लावण्याचे प्रशासनाने बजावले आहे. त्यानुसार कार्यवाही होत असल्याचे चित्र दिसून आले.