मिनीमंत्रालयात वीज देयक भरण्यासाठी नाही पैसा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:11 AM2021-07-16T04:11:09+5:302021-07-16T04:11:09+5:30
अमरावती : जिल्हा परिषदेतील महत्त्वाचे विभाग असलेल्या महिला व बालकल्याण तसेच पशुसंवर्धन विभागाचे वीज देयके थकीत असल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ...
अमरावती : जिल्हा परिषदेतील महत्त्वाचे विभाग असलेल्या महिला व बालकल्याण तसेच पशुसंवर्धन विभागाचे वीज देयके थकीत असल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी १४ जून रोजी सकाळी या दोन्ही कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे अनेक तास या कार्यालयातील कामकाज विस्कळीत झाले होते. विशेष म्हणजे, वीज देयके भरण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने जिल्हा परिषदेच्या या विभागावर देयके भरू न शकल्याने ही वेळ ओढवली होती. परंतु, लगेच पर्यायी व्यवस्था झाल्याने दुपारी या दोन्ही विभागाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला, हे विशेष
जिल्हा परिषदेच्या अधिनस्त विभागांना त्यांची विधेयके स्वतंत्रपणे भरण्याच्या सूचना आहे. सुरुवातीला संपूर्ण जिल्हा परिषदेच्या निधीतून या सर्व विभागाची देयके भरली जात होती. अशातच विजेचा अपव्यय वाढला . तसेच देयके भरताना तिजारीवर ताण येत होता. त्यामुळे सर्व विभागांना देयके भरणे स्वतंत्र मान्यता देण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे महिला व बालकल्याण विभागाचा देयकांसाठीचा निधी राज्य स्तरावर म्हणून पाठविण्यात येतो. मात्र, यंदा कोरोना परिस्थितीमुळे सर्वच भागांवर आर्थिक संकट ओढवले आहे. पर्यायाने मागील दोन ते तीन महिन्याची देयके थकीत राहिली. महिला व बालकल्याण विभाग प्रत्येकी दहा हजार रुपये थकीत राहिले. दोन्ही कार्यालयांना दोन वेळा नोटीस बजावण्यात आली होती.अखेर बुधवारी वीज कंपनीच्या कर्मचारी सकाळच्या सुमारास दोन्ही कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला. दुपारी या कार्यालयाकडून वीज बिलाचा भरणा केल्यानंतर तो पूर्ववत करण्यात आला.