ड्रायव्हिंग टेस्टसाठी आरटीओत कशाला ? गाडी शिकलात त्याच ठिकाणी द्या टेस्ट !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 01:11 PM2024-06-01T13:11:56+5:302024-06-01T13:12:37+5:30

Amravati : मार्डी मार्गालगत 'डीटीसी' केंद्र, 'जिल्हा ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर' लवकरच चालकांच्या सेवेत

No need to go to RTO for driving Licence, Take the test at the place you learned to drive! | ड्रायव्हिंग टेस्टसाठी आरटीओत कशाला ? गाडी शिकलात त्याच ठिकाणी द्या टेस्ट !

No need to go to RTO for driving Licence, Take the test at the place you learned to drive!

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आरटीओ कार्यालयांमध्ये विविध कामांसाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी जिल्हास्तरावर 'परफेक्ट ट्रेनिंग' साठी 'डीटीसी' केंद्राला मंजुरी दिली आहे. यामुळे वाहनचालक, नागरिकांना वाहनांच्या कामांसाठी आरटीओत जाण्याची गरज असणार नाही. सरकारने मार्डी मार्गालगत 'परफेक्ट ट्रेनिंग' साठी 'डीटीसी' केंद्र मंजूर केले आहे.


वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अमरावती येथे मार्डी मार्गालगत 'जिल्हा ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर'ला (डीटीसी) परवानगी दिली आहे. लवकरच हे सेंटर वाहनचालकांच्या सेवेत सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, या सोयीमुळे वाहनावर 'टेस्ट' देण्यासाठी आरटीओत जाण्याची गरज पडणार नाही.


१ जूनपासून नवे नियम लागू
सरकारने वाहतूक नियमावलीमध्ये १ जूनपासून नवीन नियम लागू केले आहेत. अत्याधुनिक ट्रॅक व यंत्राच्या साहाय्याने चालकांच्या वेगवेगळ्ळ्या चाचण्या घेऊन त्यांना वाहन चालविण्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण आवश्यक केले आहे.


मार्डी मार्गावर देण्यात येणार ड्रायव्हिंग टेस्ट
मार्डी मार्गालगत 'परफेक्ट ट्रेनिंग' केंद्र साकारण्यात आले आहे. चालकांना येथे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळणार आहे.
येथे सेम्युलेटर वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणापासून ते वाहनावर नियंत्रण मिळविण्यापर्यंत आणि 'रिअॅक्शन टेस्ट' उपलब्ध करून दिली आहे.


किती शुल्क लागणार? (डीटीसी केंद्रात)
लर्निंग लायसन्स : १५०
लर्निंग लायसन्स चाचणी शुल्क : ५०
ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क : ३००
ड्रायव्हिंग लायसन्स : २००
लायसन्स नुतणीकरण : २००
दुसऱ्या वाहनाची अतिरिक्त लायसन्स : ५००


प्रशिक्षण केंद्रांसाठी आता असणार नवे नियम
वाहतूक नियमांची अचूक माहिती देणे, धोक्याचे इशारे व दिशानिर्देश देणाऱ्या वाहतूक चिन्हांचा बोध, चढावावर किंवा उतारावर वाहन चालविताना खबरदारीची माहिती देणे, वाहनांची तांत्रिक माहिती देणे तसेच वाहनचालकांना तंत्रशुद्ध प्रशिक्षणासाठी 'डीटीसी केंद्रातून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च  (आयडीटीआर) आणि 'डीटीसी'ला परवानगी दिली आहे. अमरावती येथे सिपना अभियांत्रिकीकडे जबाबदारी देण्यात आली असून, मार्डी मार्गालगत 'परफेक्ट ट्रेनिंग' केंद्र तयार झाले आहे. हे केंद्र लवकरच सुरू होणार असून वरिष्ठांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.
- आर. टी. गीते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती

Web Title: No need to go to RTO for driving Licence, Take the test at the place you learned to drive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.